रायन गिग्स
वैयक्तिक माहिती | |||
---|---|---|---|
पूर्ण नाव | रायन जोसेफ गिग्स OBE | ||
जन्मदिनांक | २९ नोव्हेंबर, १९७३ | ||
जन्मस्थळ | कार्डिफ, वेल्स | ||
उंची | ५ ft ११ in (१.८० m) | ||
मैदानातील स्थान | Left/right winger, second striker | ||
क्लब माहिती | |||
सद्य क्लब | मॅंचेस्टर युनायटेड | ||
क्र | ११ | ||
तरूण कारकीर्द | |||
मॅंचेस्टर सिटी मॅंचेस्टर युनायटेड | |||
व्यावसायिक कारकीर्द* | |||
वर्षे | क्लब | सा (गो)† | |
१९९०– | मॅंचेस्टर युनायटेड | ५९६ (१००) | |
राष्ट्रीय संघ | |||
१९९१ १९९१–२००७ | वेल्स (२१) वेल्स | ६४ (१३) १ (०) | |
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १४:५४, २६ एप्रिल २००८ (UTC). † खेळलेले सामने (गोल). |
रायन जोसेफ गिग्स ओ.बी.ई. (नोव्हेंबर २९, इ.स. १९७३;कार्डिफ - ) हा वेल्सचा फुटबॉल खेळाडू आहे. हा मॅंचेस्टर युनायटेड संघासाठी खेळतो.
याचे मूळ नाव रायन जोसेफ विल्सन होते.
रायन गिग्स
[संपादन]परिचय
[संपादन]रायन गिग्स ने मॅंचेस्टर युनाईटेड साठी पहिले वर्ष १९९०-९१ साली खेळले. ९१-९२ सालापासून तो संघासाठी नियमित खेळाडू बनला आहे. १९९० च्या दशकात त्याची डाव्या पराचा फुटबॉलखेळाडू म्हणून ख्याती झाली. जसजशी वर्षे निघून गेली तसतसे त्याचे महत्त्व वाढत चालले आहे व संघाचा एक अतिशय परिपूर्ण खेळाडू म्हणून त्यास मानतात. बिना दमता चेंडू सातत्याने पायात ठेवणे, शत्रूसंघाच्या खेळाडूंना चकवणे व स्वतःच्या संघातील खेळाडूंसाठी गोल मारायच्या भरमसाठ संधी निर्माण करणे हे त्याचे कौशल्य. जगभर त्याची प्रसिद्धी तर आहेच, पण तो असा एकमेव फुटबॉलखेळाडू आहे जो वयाच्या ३९ व्या वर्षापर्यंत ही खेळतच आहे व ३९ व्या वर्षीच दोनहून अधिक गोलही मारलेत. तसेच त्याच्या खेळाच्या कारकिर्दीत सर्वकाळ मॅंचेस्टर युनाईटेड साठीच तो खेळत आहे.
सन्मान
[संपादन]मॅंचेस्टर युनाईटेड मध्ये आजपर्यंत त्याने १२ प्रिमियर लीग, ४ च्याम्पियन्स लीग, ३ लीग कप हे सर्व चषक जिंकले. रायन इतिहासातील असा पहिला खेळाडू ज्यास सलग दोन वर्षे "PFA वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू" हा सन्मान देण्यात आला. तो असाही एकमेव खेळाडू आहे ज्याने प्रत्येक प्रिमियर लीग मध्ये खेळून गोल मारले आहेत. रायनला ह्या युगातील सर्वात उत्तम खेळाडूंचा संघ यामध्ये निवडण्यात आले. तसेच त्याच्या नावाखाली सर्वात जास्त गोलच्या संधी उपलब्ध करून देण्याचा विश्वविक्रमही आहे. गिग्स २००७ साली वेल्श अंतरराष्ट्रीय संघासाठी शेवटचा खेळला. परंतु २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्स मध्ये तो ग्रेट ब्रिटनचा कर्णधार होता. ३१ जानेवारी २०१२ मध्ये जगभरातील सर्वेक्षण व मातादानानुसार रायनला मॅंचेस्टर युनाईटेडचा आजपर्यंतचा सर्वोत्तम फुटबॉलखेळाडू म्हणून निवडण्यात आलं. १०/०८/२०११ रोजी गिग्सला "सोनेरी बूट" हा सन्मान देण्यात आला. [१]
हा फुटबॉल-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ Ryan Giggs,सन्मान.