Jump to content

मोल (एकक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोल अथवा ग्रॅम-मोल हे रसायन शास्त्रा मध्ये वापरले जाणारे रेणूंची संख्या मोजण्याचे एकक आहे. १ मोल मध्ये ६.०२३ x १०२३ इतके रेणू असतात. रेणूंच्या या संख्येला ऍव्होगाड्रो क्रमांक असे म्हणतात.


१ ग्रॅम मोलच्या वस्तूचे वजन ग्रॅम मध्ये त्याच्या रेणूभाराइतके असते. पाण्याचा रेणूभार १८ आहे तर १ ग्रॅममोल पाण्याचे वजन १८ ग्रॅम इतके असते. याविरुद्ध १०० ग्रॅम पाण्यात ५.५५५ इतके मोल असतात.

सुटसुटीत पणा साठी किलोमोल ( १००० मोल)चे एकक बहुतांशी वापरतात. उदा १ किलोमोल पाणी म्हणजेच १८ किलो पाणी.

मोल या एककाचा उपयोग रासायनिक क्रिया पार पाडताना होतो. एखादे रसायन बनवताना त्याला लागणारी इतर रसायने यांचे प्रमाण मोलच्या साहाय्याने काढता येते. उदा: पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजनचे बनले आहे. व त्याचा रेणूभार १८ इतका आहे. तर १८ किलो पाणी बनवायला २ किलो हायड्रोजन व १६ किलो ऑक्सिजनची गरज लागेल.