मे ६
Appearance
मे ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२६ वा किंवा लीप वर्षात १२७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५४२ - संत फ्रांसिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.
सतरावे शतक
[संपादन]- १६३२ - मुघल सम्राट शाहजहान व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.
अठरावे शतक
[संपादन]- १७३९ - चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसई मोहीम जिंकून उत्तर कोकण मराठा साम्राज्यात आणले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१८ - राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.
- १८८९ - पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १८४० - पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.
विसावे शतक
[संपादन]- १९४९ - ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेर सुरू झाले.
- १९५४ - रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
- १९८३ - अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
- १९८४ - कृत्रिम श्वसन न करता एव्हरेस्ट पादाक्रांत करणारा फू दोरजी हा पहिला भारतीय ठरला.
- १९९४ - इंग्लिश खाडी खालून जाणाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडणाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅंकॉइस मित्रॉं यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
- १९९७ - बँक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता देण्यात आली.
- १९९९ - महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - पोप जॉन पॉल दुसऱ्याने सिरियातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
- २००२ - भूपिंदर नाथ किरपाल भारताचे ३१वे सरन्यायाधीश झाले.
- २०१५ - भारतीय चित्रपट अभिनेता सलमान खानला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा. हायकोर्टाने अपील वर लगेच जामिनावर सुटका केली.
जन्म
[संपादन]- १२३६ - वेन तियानशिंग, चीनी पंतप्रधान.
- १५०२ - होआव दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १७१४ - जोसेफ पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १७५५ - नेथन हेल, अमेरिकन लेखक व स्वातंत्र्यसैनिक.
- १७९९ - अलेक्सांद्र पुश्किन, रशियन कवी.
- १८५० - कार्ल फर्डिनांड ब्रॉन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८५६: ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड
- १८६१ - मोतीलाल नेहरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १८६८ - रॉबर्ट फाल्कन स्कॉट, इंग्लिश शोधक.
- १८७२ - थॉमस मान, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.
- १८९७ - पाउल आल्वेर्डेस, जर्मन कवी, लेखक.
- १९०१ - सुकर्णो, इंडोनेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९१७ - कर्क कर्कोरियन, अमेरिकन उद्योगपती.
- १९२०: जुन्या पिढीतील संगीतकार गायक बुलो सी. रानी
- १९३३ - हाइनरिक रोह्रर, नोबेल पारितोषिक विजेता स्विस भौतिकशास्त्रज्ञ.
- १९३४ - आल्बर्ट दुसरा, बेल्जियमचा राजा.
- १९४०: प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबान मिस्त्री
- १९४३ - रिचर्ड स्मॉली, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९४३: लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर
- १९५१: भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका लीला सॅमसन
- १९५३: ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष टोनी ब्लेअर
- १९५६ - ब्यॉर्न बोर्ग, टेनिस खेळाडू.
- १९५७ - माइक गॅटिंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६१-अभिनेता जॉर्ज क्लूनी
- १९८३-ऑलिंपिक पदकविजेता नेमबाज गगन नारंग
मृत्यू
[संपादन]- ६८० - खलिफा म्वाइयाह्.
- १५८९ - संगीतसम्राट तानसेन तथा रामतनू पांडे ऊर्फ मोहम्मद अट्टा खान, मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील एक नवरत्न
- १८६२ - हेन्री थोरो, अमेरिकन लेखक. (ज. १२ जुलै १८१७)
- १९२२ - छत्रपती शाहू महाराज.
- १९४६- भुलाभाई देसाई भारतीय स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित
- १९५२ - मारिया मॉंटेसरी, इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ.
- १९६६ - रॅंगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, भारतीय उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ.
- १९९५ - आचार्य गोविंदराव गोसावी, प्रवचनकार, संत वाङ्मयाचे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक.
- १९९९ - कृष्णाजी शंकर हिंगवे, पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य.
- २००१ - मालतीबाई बेडेकर, मराठी कादंबरीकार, लेखिका.
- २०१७ - उस्ताद रईस खां, भारतीय सतारवादक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- हॉलोकॉस्ट स्मृति दिन - इस्राइल
- आंतरराष्ट्रीय "नो-डाएट" दिवस.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मे ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)