मार्च ७
Appearance
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६५ वा किंवा लीप वर्षात ६६ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७९८ - फ्रांसच्या सैन्याने रोमचा पाडाव केला व रोमन प्रजासत्ताकची स्थापना झाली.
- १७९९ - नेपोलियन बोनापार्टने पॅलेस्टाईनमधील जाफा शहर जिंकले. २,०० आल्बेनियन कैद्यांची कत्तल.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१४ - नेपोलियन बोनापार्टने क्राओनची लढाई जिंकली.
- १८२७ - ब्राझिलच्या सैनिकांनी आर्जेन्टिनाच्या कार्मेन दि पॅटागोन्सच्या नाविक तळावर हल्ला केला परंतु स्थानिक नागरिकांनी त्यांना पळवून लावले.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध-पी रिजची लढाई - जनरल सॅम्युएल कर्टीसच्या नेतृत्वाखाली युनियन सैन्याने जनरल अर्ल व्हान डॉर्नच्या कॉन्फेडरेट सैन्याला पी रिज, आर्कान्सा येथे हरवले.
- १८७६ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलला टेलिफोनच्या शोधासाठी पेटंट मिळाला.
विसावे शतक
[संपादन]- १९११ - मेक्सिकोत क्रांति.
- १९१२ - रोआल्ड अमुंडसेनने आपले शोधपथक दक्षिण ध्रुवावर पोचल्याचे जाहीर केले.
- १९१८ - पहिले महायुद्ध - फिनलंडने जर्मनीशी संधी केली.
- १९३६ - दुसरे महायुद्ध - व्हर्सायचा तह धुडकावुन जर्मनीने ऱ्हाइनलॅंडमध्ये सैन्य पाठवले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीत रेमाजेन जवळचा ऱ्हाइन नदीवरचा पूल काबीज केला.
- १९५१ - कोरियन युद्ध - संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याने चीनी सैन्यावर हल्ला केला.
- १९६५ - अलाबामाच्या सेल्मा शहरात ६०० लोकांचे समान हक्कांसाठीचे निदर्शन पोलिसांनी मोडुन काढले.
- १९८९ - चीनने तिबेटची राजधानी ल्हासामध्ये लश्करी कायदा लागु केला.
एकविसावे शतक
[संपादन]- २००५ - स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कुवैतच्या संसदेसमोर निदर्शने.
- २००६ - लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.
- २०१४ - मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७० हे बोईंग ७७७ प्रकारचे विमान कुआलालंपुरपासून बीजिंगला चाललेले असताना २३९ प्रवासी व कर्मचाऱ्यांसह नाहीसे झाले.
- २०१७ - गुजरातमध्ये नर्मदा नदीवर भरुच जवळ भारतातील सर्वाधिक लांबीच्या केबल ब्रिजचे[मराठी शब्द सुचवा] उद्घाटन.
जन्म
[संपादन]- १८९ - पब्लियस सेप्टिमियस गेटा, रोमन सम्राट.
- १६९३ - पोप क्लेमेंट तेरावा.
- १७९२ - जॉन हर्षल, इंग्लिश गणितज्ञ व अंतराळतज्ञ.
- १८५० - टोमास मासारिक, चेकोस्लोव्हेकियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १८५१ - फ्रॅंक पेन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६० - रेजिनाल्ड वूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६४ - जॉर्ज बीन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९११ - सच्चिदानंद हिराचंद वात्सायन, आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार.
- १९१८ - स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर, मराठी साहित्यिक.
- १९१८ - जॅक आयकिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२० - विली वॅट्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - नरी कॉॅंट्रॅक्टर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - गुलाम नबी आझाद, भारतीय राजकारणी.
- १९५२ - व्हिव्ह रिचर्ड्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५५ - अनुपम खेर, भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू
[संपादन]- ३२२ - ऍरिस्टोटल, ग्रीक तत्त्वज्ञ.
- १६१ - ॲंटोनियस पायस, रोमन सम्राट.
- १६४७ - दादोजी कोंडदेव, छत्रपती शिवाजी महाराजांचे पालक आणि शिक्षक
- १७२४ - पोप इनोसंट तेरावा.
- १९२२ - गणपतराव जोशी, मराठी नाट्यअभिनेता.
- १९५२ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
- १९६१ - गोविंद वल्लभ पंत, भारताचे दुसरे गृहमंत्री.
- १९७४ - टी.टी. कृष्णमाचारी, भारतीय अर्थमंत्री.
- १९९३ - इर्झा मीर, माहितीपट निर्मिता.
- २००० - प्रभाकर तामणे, मराठी लेखक.
- २०१२ - रवि शंकर शर्मा ऊर्फ रवि, भारतीय संगीतकार.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मार्च ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च ५ - मार्च ६ - मार्च ७ - मार्च ८ - मार्च ९ - (मार्च महिना)