Media Advisor to LoP, Maharashtra state assembly | Former Journalist | Spiritual | Tweets are personal https://t.co/H3jJTPssKb
Sep 13, 2022 • 6 tweets • 3 min read
वेदांता आणि फोक्सकोन यांचा प्रकल्प महाराष्ट्रात आला तर याबाबत MIDC ने अभ्यास केलं होता
तसेच महाराष्ट्र आणि गुजरात मधील जागेबाबत तुलनात्मक अभ्यास करण्यात आला होता
सामच्या हाती अहवालातील महत्वाची माहिती
#महाराष्ट्र
हा प्रकल्प आल्यास महाराष्ट्रात १ लाखपर्यंत रोजगार निर्मिती झाली असती
या प्रकलप नंतर राज्यात २१ बिलियन डॉलर थेट गुंतवणूक आली असती
कर माध्यमातून २६ हजार २०० कोटी राज्याला मिळाले असते
या प्रकल्पात कंपनी अतिरिक्त गुंतवणूक ५ ते ८ बिलियन डॉलर इतकी केली असती
ब्रेकिंग
थेट सरपंचपदांसह 1,166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान
18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे.
त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होईल
संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील #निवडणूक
Dec 9, 2020 • 5 tweets • 3 min read
एक मुलगी प्रेमात पडते..लग्न करते..दुसऱ्या देशात सासरी नांदायला येते ( मुंबईत पश्चिम रेल्वेला राहणाऱ्या लोकांना मध्य रेल्वेला राहणाऱ्याचे स्थळ नको हवं असतं) वेगळं वातावरण,संस्कृती,भाषा सगळं स्वीकारते.. #काँग्रेस
नवऱ्याचं घराणं, राजकारण सतत तणाव, त्यात इंदिरा गांधी सारखी सासू (आपल्या घरातील किचन पोलिटिक्स सासू-सून वाद बघा.. ) डोळ्यासमोर दोन जिवलग लोकांची हत्या ,द्वेष पचवून इथे टिकणे.. साधी गोष्ट नाही #काँग्रेस
Jul 12, 2020 • 4 tweets • 2 min read
एक सुपरस्टारला कोरोना झाल्यावर हळहळणारी ही तीच लोक आहेत ज्यांच्या आसपास कुणाला कोरोना झाली की हे आधी बिळात पळतात
ही तीच लोक आहेत की कोणी कोरोना positive आला की मागून गॉसिप करतात
ही लोक कशी बेजबाबदार आहेत, यांच्यामुळे इतरांना कसा धोका आहेत अशी चर्चा करतात.. cont.. #CoronaDiary
ह्यांच्यामुळे इतरांना पण कोरोना झाला असा निष्कर्ष काढतात,जेव्हा डॉकटर पण सांगू शकत नाही एखाद्या व्यक्तीला विषाणूची बाधा कशी आणि कुठे झाली
ही तीच लोक आहेत जी whatsapp group वर कोरोना झालेल्या व्यक्तीला नैतिकतेचा आव आणत लेक्चर देतात..आधी लक्षण दिसल्यावर संगायच होत #coronaDiary
Apr 6, 2020 • 6 tweets • 1 min read
जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा
मुंबई प्रयोगशाळा- कस्तुरबा रुग्णालय आणि केईएम रुग्णालय, परळ
2. रायगड, ठाणे,कल्याण डोबिंवली, नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा - ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई
3. पालघर जिल्ह्याकरिता - उल्हासनगर मिरा-भाईंदर, भिवंडी, वसई-विरार, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा- हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ
4. सातारा जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे