Kalpesh | कल्पेश Profile picture
Marathi | Learning Everyday, Focusing and helping on career and Skill development | 1% Daily Improvement | RT≠Endorsement | DM FOR COLLAB
Mar 1 10 tweets 4 min read
उन्हाच्या झळा वाढायला लागल्या आहेत, पण ही गरमी अजून किती वाढेल?
यंदाचा उन्हाळा महाराष्ट्रातील सर्वात उष्ण असेल का? डेटा आणि हवामान खाते काय सांगते?
समजून घ्या. 🧵 Image महाराष्ट्रात उन्हाळ्यातील तापमान साधारणतः २२°C ते ४३°C दरम्यान असते.
विदर्भातील (नागपूर, अकोला) तापमान ४७°C पर्यंत जाते, तर कोकण (मुंबई, रत्नागिरी) सागरी प्रभावामुळे तुलनेने सौम्य म्हणजे ३३-३८°C राहते.
पण यावर्षीचा उन्हाळा असाच राहील का?

Image
Image
Feb 28 10 tweets 3 min read
भारत सरकारने शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) 2020 अंतर्गत APAAR ID कार्ड सुरू केले आहे.
APAAR ID चे फायदे, नोंदणी प्रक्रिया, डाउनलोड करण्याची पद्धत आणि इतर महत्त्वाची माहिती समजून घ्या 🧵 Image याला Automated Permanent Academic Account Registry असे अधिकृतपणे संबोधले जाते. हे "One Nation, One Student ID" या संकल्पनेवर आधारित असून, संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी एकमेव 12-अंकी ओळख देते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नोंदी, प्रमाणपत्रे आणि
Feb 27 10 tweets 3 min read
बनावट नोटा घोटाळा
इंस्टाग्राम वर असे बरेच रिल्स खुलेआम फिरत आहेत. ज्यामध्ये ही लोक बनावट नोटा विकण्याचा दावा करत आहेत, एक लाख द्या दोन लाख कॅश घेऊन जा, असे खुलेआम सांगितले जात आहे सोबत मोठ्या गाड्या आणि हेलिकॉप्टर देखील दाखवले जात आहेत.🧵 Image जर तुम्ही एखादी reel वारंवार पाहिली, तर इंस्टाग्राम अल्गोरिदम आपोआप त्यासारख्या आणखी reels दाखवू लागतो.

त्यामुळे मला अशा reels दिसायला लागल्या आहेत, जिथे लोक बनावट भारतीय नोटा विकत आहेत.
Feb 27 8 tweets 3 min read
AI युगात टिकून राहायचे असेल तर ही 3 कौशल्य नक्कीच शिकून घ्या.
माहितीच्या महापुरात कोणती गोष्ट खरी आणि कोणती चुकीची हे ओळखणे कठीण झाले आहे. AI मोठ्या प्रमाणावर कंटेंट निर्माण करत आहे, आणि चुकीची माहिती क्षणात पसरते. योग्य कौशल्य तुम्हाला या माहितीच्या महापुरातून नक्की वाचवतील. Image १. डॉट कनेक्टिंग

आज माहिती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, पण त्यातून योग्य अर्थ लावण्याची कला फारच थोड्यांकडे आहे. २०१५ मध्ये जगभरात १६ झेट्टाबाइट (१ ट्रिलियन गिगाबाइट) डेटाचा वापर झाला होता, आणि २०२५ पर्यंत हा आकडा १८१ झेट्टाबाइट पर्यंत जाणार आहे.
Feb 25 11 tweets 4 min read
काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्स, जे इतर देशांमध्ये विक्री करण्यास सक्त मनाई आहे, ते भारतात खुलेआम विक्री करत आहेत आणि सामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.
या पदार्थांमध्ये वापरले गेलेले केमिकल तुम्हाला आजारी करत आहेत. Image 2024 मध्ये, युरोपियन युनियनने 400 हून अधिक भारतीय अन्नपदार्थांमध्ये ethylene oxide, aflatoxins, आणि tricyclazole सारख्या कर्करोगजन्य घटकांचे प्रमाण आढळल्याचे नमूद केले. विशेषतः, एम.डी.एच. आणि एव्हरेस्ट यांसारख्या लोकप्रीय मसाला
Feb 17 12 tweets 3 min read
सोशल मिडियाने एक पूर्ण जनरेशन घडवली आणि बिघडवली देखील, तसेच जी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे ती भविष्यातील पिढ्यांवर काय परिणाम करू शकते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. यावर झालेले रिसर्च आणि अहवाल याच भविष्याबद्दल बोलतात, जाणून घेऊया. Image World Economic Forum च्या 2020 च्या "Future of Jobs Report" नुसार, 85 दशलक्ष नोकऱ्या AI आणि ऑटोमेशनमुळे नष्ट होतील, तर 97 दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण होतील. मात्र, हा बदल सहज होणार नाही आणि अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होऊ शकते.
Feb 16 7 tweets 2 min read
काल रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत किमान १५ जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये अनेक स्त्रिया आणि लहान मुले होती. महाकुंभ साठी निघालेल्या या भाविकांच्या मृत्यूचा जबाबदार कोण? का चेंगचेगारी हा पुन्हा पुन्हा कित्येक लोकांच्या मृत्यूचे कारण बनतं? Image दुर्घटना कशी घडली?

महाकुंभसाठी जाणाऱ्या भाविकांमुळे प्लॅटफॉर्मवर क्षमतेपेक्षा अधिक लोक एकत्र झाले. दोन विशेष गाड्या उशिरा धावत असल्याने लोकांना प्लॅटफॉर्मवर तासन्‌तास थांबावे लागले, ज्यामुळे तणाव वाढला.
इतक्या मोठ्या गर्दीचे नियोजन नव्हतेच.
Feb 13 14 tweets 3 min read
एकेकाळी स्वतंत्र, शांत, आणि आध्यात्मिकतेने नटलेले तिबेट आता एका संघर्षाचे प्रतीक बनले आहे. या भूमीच्या मोकळ्या रस्त्यांवर, लामा भिक्षूंनी चालवलेल्या मठांमध्ये, आणि थंड वाऱ्याच्या झुळुकांमध्ये इतिहासाच्या खोल जखमा दडलेल्या आहेत.
हे का झालं? चीनने कश्याप्रकारे तिबेट काबीज केलं? Image १९४९ साली चीनमध्ये माओ झेडॉन्ग यांच्या नेतृत्वाखाली साम्यवादी क्रांती झाली आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्थापन झाले.
तिबेट १९१२ ते १९५० या काळात स्वतंत्र होता स्वतःची सरकारव्यवस्था, चलन, सैन्य, आणि आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या या भूमीवर नव्याने जन्मलेल्या या चीनने नजर टाकली.
Feb 11 10 tweets 2 min read
भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सतत घसरत आहे आणि सध्या तो ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. 11 फेब्रुवारी 2025 रोजी रुपयाने 86.65 चा स्तर गाठला, आणि आशियातील सर्वात खराब प्रदर्शन करणारा चलन ठरला आहे.
पण असं का होतंय? यामागची कारण समजून घ्या. Image रुपयाचे मूल्य आर्थिक घटकांवर अवलंबून असते.

आयात-निर्यात असंतुलन
भारताचा व्यापार तुटीचा आकडा ऑक्टोबर 2024 मध्ये $26.83 अब्जांवर पोहोचला आहे. कच्च्या तेलासह अन्य महत्त्वाच्या वस्तूंच्या वाढत्या आयातीमुळे डॉलरची मागणी वाढते, परिणामी रुपयाचे मूल्य कमी होते.
Feb 9 12 tweets 3 min read
बऱ्याच वर्षांनी छत्रपती महाराजांचा इतिहास, साहस आणि रहस्य यांवर भाष्य करणारी काल्पनिक पण इतिहासाची जोड असलेली एक सुंदर वेबसीरिज काल बघितली, ती म्हणजे 'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार्स'
ही वेबसिरिज सर्वांनी बघितली पाहिजे का? काय आहे या वेबसिरीज मध्ये? जाणून घ्या या थ्रेड मधून Image Hotstar वर प्रदर्शित झालेली ही वेबसीरिज इतिहास, साहस आणि रहस्य यांचा उत्तम संगम साधते, 31 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या मालिकेचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले असून, ती डॉ. प्रकाश कोयाडे यांच्या ‘प्रतिपश्चंद्र’ या मराठी कादंबरीवर आधारित आहे
Jan 31 12 tweets 4 min read
तुमच्या मृत्यूनंतर ६ महिन्यांतच तुम्हाला सर्व विसरून जातील...

Alex Hormozi यांचे आयुष्य आणि व्यवसायावर प्रभाव टाकणारे हे १० धडे समजून घ्या. Image "जग तुमच्यावर विश्वास ठेवेल, पण प्रथम तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा!"

यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेच टाळ्या वाजवतील. पण संघर्षाच्या वाटेवर तुम्ही एकटेच असाल!

स्वप्रेरणा हीच खरी शक्ती आहे, तिला ओळखा आणि वापरा.
Jan 28 9 tweets 2 min read
चीनी AI स्टार्टअप डीपसीकच्या उदयानं जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात, विशेषतः AI आणि सेमीकंडक्टर उद्योगांमध्ये खळबळ उडवली आहे. यामागचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे. कारण US मार्केट सोबत भारतीय मार्केट वर देखील याचा प्रभाव पडला आणि पुढे देखील पडेल. Image डीपसीकनं आपला AI मॉडेल फक्त $5.6 दशलक्ष खर्चात विकसित केलं. तुलनेत, ओपनएआय, गूगल, आणि मायक्रोसॉफ्टसारख्या पश्चिमी दिग्गज कंपन्या यासाठी अब्जावधी डॉलर खर्च करतात. यामुळे असा प्रश्न उभा राहतो की, एवढ्या कमी खर्चात देखील उत्तम मॉडेल बनू शकत का?
Jan 26 10 tweets 3 min read
जानेवारी 2025 च्या एका सकाळी, आंध्र प्रदेशचा 32 वर्षांचा पर्यटक तादी महेश रेड्डी, हिमाचल प्रदेशातील कुल्लूमधील एका डोंगरावर पराग्लायडिंगचा अनुभव घेत होता हवेत उंच चढताना, अचानक एक वाऱ्याचा झटका त्याच्या उड्डाणामध्ये गडबड करतो आणि त्याच्या स्वप्नातील साहस दुःखद दुर्घटनेत बदलते. Image ही घटना एकटा नाही. मागील काही वर्षांमध्ये, असे अनेक अपघात भारतभर घडले आहेत, ज्यामुळे साहसी खेळांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

18 जानेवारी 2025 रोजी हिमाचल प्रदेशात दोन वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या. धर्मशाळेतील इंद्रुनाग परिसरात गुजरातच्या 19 वर्षीय भावनाचा
Jan 9 10 tweets 3 min read
फेब्रुवारी 2024 मध्ये टॉरेस ज्वेलर्स या आलिशान ज्वेलरी ब्रँडने मुंबईत आपले विविध ठिकाणी शोरूम्स सुरू केली, जसे की दादर, ग्रँट रोड, कल्याण, मीरा रोड आणि सानपाडा (नवी मुंबई)
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी Image त्यांनी मोइसानाइट स्टोन्सवर अत्यंत जास्त परताव्याची हमी दिली. आठवड्याला 11% पर्यंत परतावा, वार्षिक 520% परतावा आणि आकर्षक भेटवस्तू जसे लक्झरी गाड्या, फ्लॅट्स यांचे प्रलोभन दिले गेले.
यांनी लोकांना कसं फसवल समजून घ्या आणि भविष्यात ही चूक तुमच्याकडून होणार नाही याची काळजी घ्या.
Dec 18, 2024 14 tweets 4 min read
आपण कधी विचार केला आहे का, काही लोक सहजपणे त्यांची स्वप्ने सत्यात उतरवतात, तर काही जण अदृश्य अडथळ्यांशी झगडत राहतात?
याचे उत्तर त्यांच्या जिद्दीत नाही, तर त्यांच्या अवचेतन मनाच्या सामर्थ्यात आहे. हे शांत मन आपल्या विचारांचे, भावनांचे आणि कृतींचे 95% भाग नियंत्रित करते.
🧵 Image पण हे अवचेतन मन आहे तरी काय?
अवचेतन मन सुपीक जमिनीसारखे आहे, जिथे विश्वास, भावना आणि अनुभवांची बीजे रुजतात. जसे निकोला टेस्ला म्हणाले, "जर तुम्हाला विश्वाचे रहस्य समजून घ्यायचे असेल, तर उर्जेच्या, कंपनांच्या आणि वारंवारतेच्या दृष्टीने विचार करा." तसेच, आपले अवचेतन मन आपल्या.. Image
Dec 10, 2024 9 tweets 2 min read
वय वाढतंय त्यात हे सेल्फ लर्निंग - स्वयांविकास शक्य आहे का?
लहानपणापासूनच सर्वकाही चांगल्या पद्धतीने करण्याचं आपण शिकलो – चांगल्या गुणांसाठी मेहनत केली, परीक्षांमध्ये अव्वल राहिलो. परंतु, या सगळ्या शैक्षणिक दडपणामुळे आपण स्वतःच्या सुधारणेचं आणि वैयक्तिक विकासाचं राहूनच गेलं.
🧵 Image स्वतःला सुधारण्याकडे दुर्लक्ष का होतं?
आपण अनेकदा आपले दोष झाकून ठेवतो, त्यांना सामोरं जाण्याचं टाळतो किंवा अनभिज्ञ राहणंच सोयीस्कर मानतो. पण सत्य हे आहे की, आपण स्वतःपासून पळून जाऊ शकत नाही. जितक्या लांब पळालं, तितकं खोल आपल्यासाठी संकट निर्माण होतं.
Dec 9, 2024 10 tweets 2 min read
काय आहे फार्मर आयडी?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवी सुविधा!
शेतकरी आता घरबसल्या आपले फार्मर आयडी (Farmer ID) ऑनलाइन तयार करू शकतात.
केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक (Agristack) योजनेअंतर्गत ही प्रक्रिया सुलभ झाली आहे.
🧵 Image 1️⃣ शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?

हे डिजिटल स्वरूपाचे ओळखपत्र असून, त्यात खालील माहिती असते:

-आधार कार्डशी जोडलेली माहिती
-शेतीचा तपशील:
जमिनीचा सर्व्हे नंबर
प्लॉट नंबर
पीक पद्धती व जमीन क्षेत्र
-सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त तपशील
Dec 2, 2024 7 tweets 2 min read
ग्रॅच्युइटी म्हणजे काय?

आज आपण 'ग्रॅच्युइटी' या महत्त्वपूर्ण आर्थिक संकल्पनेबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. ग्रॅच्युइटी म्हणजे एक प्रकारचा पुरस्कार किंवा बोनस, जो दीर्घकाळ एका कंपनीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. ग्रॅच्युइटी कायदा आणि Calculation समजून घेऊया.
🧵 Image ग्रॅच्युइटी म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा आर्थिक लाभ, जे कंपनीत किंवा संस्थेत दीर्घकाळ कार्यरत असतात. भारतात, जर एखादा कर्मचारी एका कंपनीत 5 वर्षांपेक्षा जास्त काळ काम करत असेल, तर त्यास ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार असतो Image
Nov 29, 2024 7 tweets 2 min read
भारताची न्यायव्यवस्था ही एक जटील आणि बहुआयामी संरचना आहे यात शंका नाही. पण तुम्हाला माहिती आहे का कोणती न्यायालये कोणत्या श्रेणीमध्ये येतात आणि त्यांच्या भूमिका काय? समजून घेऊया.
🧵 Image न्यायालये मुख्यत: तीन गटात वर्गीकृत आहेत.

1. सिव्हील न्यायालये: ही न्यायालये मालमत्ता, करार आणि इतर सिव्हील बाबींशी संबंधित वाद हाताळतात.

2. सत्र न्यायालये: ही न्यायालये चोरी आणि लुटमार यासारख्या फौजदारी केसींच्या चाचणीसाठी जबाबदार असतात.Image
Nov 28, 2024 7 tweets 2 min read
महिंद्रा XEV 9e EV सध्या चर्चेत आहे या गाडीबद्दल थोडंसं, ही गाडी इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये एक मजबूत स्पर्धक नक्कीच बनेल.
🧵 Image मुख्य फिचर्स
1. परफॉर्मन्स:
- बॅटरी: 79 kWh लिथियम-आयन बॅटरी
- रेंज: एकाच चार्जवर 682 किमी पर्यंत
- पॉवर आउटपुट: 362 bhp (कमाल)
- टॉर्क: 380 Nm
- एक्सलेरेशन: 0-100 किमी/तास साधारण 5.6 सेकंदात Image
Nov 25, 2024 8 tweets 3 min read
सध्या जोरदार चर्चेत असलेला विषय म्हणजे या निवडणुकांमध्ये EVM हॅक झाले आणि निकाल बदलण्यात आला, पण खरोखर EVM हॅक होऊ शकतात का? थ्रेड नीट वाचा.
🧵 Image EVMs सुरक्षेच्या दृष्टीने डिझाइन केलेले आहेत, परंतु त्यातल्या काही धोक्यांपासून ते पूर्णपणे मुक्त नाहीत. याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आणि संदर्भ आहेत काही रिपोर्ट्स देखील याबद्दल आधिदेखील निघाल्या आहेत त्या कोणत्या? त्यांनी नेमक काय सांगितलं?