क्रिकेट विश्वचषक, २००७
२००७ क्रिकेट विश्वचषक | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | ||
क्रिकेट प्रकार | एक दिवसीय आंतरराष्ट्रीय | ||
स्पर्धा प्रकार | राऊंड-रॉबिन आणि नॉकआउट | ||
यजमान | वेस्ट इंडीज | ||
विजेते | ऑस्ट्रेलिया (४ वेळा) | ||
सहभाग | १६ (९७ देशातून) | ||
सामने | ५१ | ||
प्रेक्षक संख्या | ६,७२,००० (१३,१७६ प्रति सामना) | ||
मालिकावीर | ग्लेन मॅकग्रा | ||
सर्वात जास्त धावा | मॅथ्यू हेडन (६५९) | ||
सर्वात जास्त बळी | ग्लेन मॅकग्रा (२६) | ||
|
इ.स. २००७ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा मार्च १३ ते एप्रिल २८, २००७ च्या दरम्यान वेस्ट ईंडीझमध्ये झाली. सोळा देशांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत ५१ सामने होते. आठ देशात होणाऱ्या या सामन्यांच्या मैदानांवर अंदाजे ३०,१०,००,००० (तीस कोटी दहा लाख अमेरिकन डॉलर) खर्च करण्यात आले. स्पर्धेचे अधिकृत गान द गेम ऑफ लव्ह अँड युनिटी, हे जमैकाच्या शॅगी, बार्बाडोसच्या रुपी व त्रिनिदादच्या फेय-ऍन ल्यॉन्सने रचले. नारंगी रंगाचा रॅकून प्राणी स्पर्धेचे प्रतीकहोता. याचे नाव मेलो असे आहे. स्पर्धेचा उदघाटन सोहळा जमैकातील ट्रिलॉनी शहरातील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये मार्च ११ रोजी झाला.
अकरा एकदिवसीय सामने खेळणारे व पाच अन्य अशा सोळा देशांनी प्रत्येकी चार देशांच्या अशा चार गटातून सुरुवात केली. ही विभागणी प्रत्येक देशाच्या दोन वर्षांपूर्वीच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकानुसार करण्यात आली होती. हे गट एकाच देशात आपले सामने खेळत आहेत. प्रत्येक गटातील दोन सर्वोत्तम संघांना सुपर एट फेरीत प्रवेश मिळाला. या फेरीतील आठपैकी ऑस्ट्रेलिया, न्यू झीलँड, श्रीलंका व दक्षिण आफ्रिका हे चार सर्वोत्तम संघ उपांत्य सामन्यांत लढले. अंतिम सामना श्रीलंका व ऑस्ट्रेलियामध्ये झाला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ५३ धावांनी पराभव करीत सलग तिसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला व जागतिक क्रिकेटमधले आपले वर्चस्व पुनः एकदा सिद्ध केले.
विश्वचषक खेळणारे संघ
[संपादन]आत्तापर्यंतच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये सगळ्यात जास्त (१६) संघ या स्पर्धेत भाग घेत आहेत. कसोटी क्रिकेट खेळणारे दहा देश व केन्याला स्पर्धेत आपोआप निमंत्रण मिळाले. उरलेल्या पाच जागांसाठी २००५ च्या आय.सी.सी. चषक सामन्यातील पहिल्या पाच संघांना निमंत्रण देण्यात आले.
पूर्व-क्रमांक (सीडिंग) |
संघ | गटblan | blank Space | पूर्व-क्रमांक (सीडिंग) |
संघ | गटblan | blank Space | पूर्व-क्रमांक (सीडिंग) |
संघ | गटblan | blank Space | पूर्व-क्रमांक (सीडिंग) |
संघ | गटblan |
१ | ऑस्ट्रेलिया | A | blank Space | ५ | दक्षिण आफ्रिका | A | blank Space | ९ | झिम्बाब्वे | D | blank Space | १३ | आयर्लंड | D |
२ | श्रीलंका | B | blank Space | ६ | भारत | B | blank Space | १० | केन्या | C | blank Space | १४ | कॅनडा | C |
३ | न्यू झीलँड | C | blank Space | ७ | इंग्लंड | C | blank Space | ११ | बांगलादेश | B | blank Space | १५ | बर्म्युडा | B |
४ | पाकिस्तान | D | blank Space | ८ | वेस्ट इंडीज | D | blank Space | १२ | स्कॉटलंड | A | blank Space | १६ | नेदरलँड्स | A |
स्पर्धेचे स्वरूप व नियम
[संपादन]स्पर्धेची सुरुवात साखळी सामन्यांनी झाली. विश्वकप खेळणाऱ्या १६ संघाना ४ गटात त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांका प्रमाणे विभागण्यात आलेले होते. प्रत्येक गट आपले सर्व सामने एकाच मैदानावर खेळला. एकूण २४ साखळी सामने मार्च १३, २००७ ते मार्च २७, २००७ पर्यंत खेळले गेले.
साखळी सामन्यांच्या अंती प्रत्येक गटातील प्रथम दोन संघ सुपर एट सामने खेळले. यातील चार सर्वोत्तम संघ उपांत्य सामने खेळले. उपांत्य सामन्यात विजयी ठरलेले संघ अंतिम सामन्यात लढले.
सामन्यांबद्दलचे नियम
[संपादन]दिवसा खेळले जाणारे सामने सकाळी ९:३० ते संध्याकाळी १७:१५ च्या दरम्यान खेळण्यात आले होते. पहिला डाव ९:३० ते १३:०० तर दुसरा डाव १३:४५ ते १७:१५ पर्यंत होता. किंग्स्टन, जमैका येथील सामने एक तास उशीरा सुरू होउन एक तास उशीरा संपले.
सर्व सामने एक-दिवसीय होते एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचे सर्व नियम या सामन्यांत लागू होते. प्रत्येक सामना ५० षटकांचा होता. यात पंचांना (पाउस वा इतर कारणांस्तव) बदल करण्यास मुभा होती. एका गोलंदाजाला जास्तीत जास्त १० (किंवा ठरलेल्या षटकांच्या एक पंचमांश) षटके टाकता येणार हती. हवामान खराब झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी कमीतकमी २० षटके खेळता आली नाहीत तर सामना रद्द ठरवण्यात येणार होता. जर दुसऱ्या डावात मोसमाचा व्यत्यय आला तर सामन्याचा विजेता अथवा लक्ष्य ठरवण्यासाठी डकवर्थ-लुईस रीतीचा वापर करण्यात आला.
जर मैदानातील पंचांना एखाद्या झेलाबद्दल (तो नीट पकडला गेला आहे की नाही याबद्दल) शंका असेल तर मैदानातील पंच अश्या झेलाबाबत तिसऱ्या पंचांचा सल्ला घेता आला. असा सल्ला विचारला असता तिसऱ्या पंचाला जर आढळले की मुळात चेंडूला बॅट लागलेलीच नाही तर त्यांना फलंदाजाला नाबाद घोषित करता येणार होते.
गुण
[संपादन]प्रत्येक साखळी साखळी सामन्याच्या व सुपर ८ सामन्याच्या अंती दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना खालीलप्रमाणात गुण दिले गेले.
निकाल | गुण |
विजय | २ |
अनिर्णित/समसमान | १ |
हार | ० |
प्रत्येक गटातील साखळी सामन्यातून जास्तीत जास्त गुण मिळवणारे दोन संघ सुपर ८ फेरीत गेले. त्याच वेळी आपल्या गटातून पुढच्या फेरीत जाणाऱ्या दुसऱ्या संघाविरुद्ध कमावलेले गुणही त्यांच्या सुपर ८ च्या गणतीत आपोआप आले. सुपर ८ फेरीतील प्रत्येक संघ सात प्रतिस्पर्ध्यांपैकी आपल्या गटातील संघ सोडून उरलेल्या सहा संघांविरुद्ध एक-एक सामना खेळले. या सामन्यातून मिळालेल्या गुणांवर (व आधीच्या फेरीतील आपल्याच गटातील प्रतिस्पर्ध्यासमोर मिळवलेल्या गुणांसह) पहिले चार संघ उपांत्य फेरीत पोचले. हे सामने १ विरुद्ध ४ आणि २ विरुद्ध ३ क्रमांकाच्या संघामध्ये होणार होते. यातील विजयी संघ अंतिम सामना खेळले व त्यातील विजेता जगज्जेता ठरला.
जर साखळी अथवा सुपर ८ फेरीत दोन किंवा जास्त संघांना समान गुण असतील तर ती गाठ उकलण्यासाठी खालील नियमांचा आधार घेतला जाणार होता. अशा संघांपैकी पुढे जाणारा संघ --
- आपल्या गटात किंवा सुपर ८ फेरीत जास्तीत जास्त विजय मिळवणारा संघ असेल.
- जर समान विजय असतील तर जास्तीत जास्त नेट रन रेट असणारा संघ असेल.
- तेही समान असल्यास आमने-सामने झालेल्या सामन्यातील विजयी संघ असेल.
- असा सामना अनिर्णित असेल तर चिठ्ठ्या टाकून निडलेला संघ असेल.
उपांत्य किंवा अंतिम फेरीत सामना समसमान झाला किंवा अनिर्णित राहिला तर खालील नियम लागू होतील --
- समसमान सामना - बोल-आउट. यात दोन्ही संघातील पाच गोलंदाज प्रत्येकी दोन चेंडू फलंदाजाशिवाय यष्टींकडे टाकतील. पैकी ज्या संघाचे गोलंदाज जास्तवेळा यष्टी मोडतील, तो संघ विजेता ठरेल. जर हा आकडाही समान असेल तर दोन्ही संघ आळीपाळीने चेंडू टाकतील व जेंव्हा दोन्हीमध्ये दोन आघातांचे अंतर होईल तेंव्हा जास्तवेळा यष्टी मोडलेला संघ विजयी ठरेल.
- अनिर्णित सामना - जर उपांत्य फेरीतील सामना अनिर्णित घोषित केला गेला तर सुपर ८ फेरीत ज्या संघाचा नेट रन रेट जास्त असेल तो संघ विजयी ठरेल. अंतिम फेरीतील सामना अनिर्णित ठरला तर दोन्ही प्रतिस्पर्धी संयुक्त विजेते घोषित केले जातील.
मैदाने
[संपादन]देश | शहर | मैदान | प्रेक्षकसंख्या | सामने | खर्च |
एन्टीग्वा आणि बार्बुड | सेंट जॉन | सर विवियन रिचर्ड्स मैदान | २०००० | सुपर ८ | $५.४ कोटी |
बार्बडोस | ब्रिज टाउन | किंग्स्टन ओव्हल | ३२,००० | सुपर ८ व अंतिम | $६.९१ कोटी |
ग्रेनेडा | सेंट जॉर्ज | क्वीन्स पार्क | २०,००० | सुपर ८ | |
गयाना | जॉर्ज टाउन | प्रोव्हीडन्स मैदान | २०,००० | सुपर ८ | $४.६ कोटी |
जमैका | किंगस्टन | सबाइना पार्क, जमैका | ३०,००० | गट D व उपान्त्य | $२.६ कोटी |
सेंट किट्स आणि नेविस | बस्सेटेर्र | वार्नर पार्क मैदान | १०,००० | ग्रुप A | $१.२ कोटी |
सेंट लुसिया | ग्रॉस इस्लेट | बीसेजौर मैदान | २०००० | गट C व उपांत्य | $२.३ कोटी |
त्रिनिदाद आणि टोबॅगो | पोर्ट ऑफ स्पेन | क्वीन्स पार्क ओवल | २५,००० | गट B |
सराव सामन्यांसाठी मैदाने
[संपादन]देश | शहर | मैदान | प्रेक्षकसंख्या | खर्च |
बार्बडोस | ब्रिजटाउन | ३डब्ल्यूज ओव्हल | ३,५०० | |
जमैका | ट्रेल्वनी | ग्रीनफिल्ड मैदान | २५,००० | $३.५ कोटी |
सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडीन्स | किंग्स टाउन | अर्नोस वेल मैदान | १२,००० | |
त्रिनिदाद आणि टोबॅगो | सेंट ऑगस्टीन | सर फ्रॅंक वॉरेल मेमोरियल मैदान |
विश्वकप २००७ प्रगती
[संपादन]साखळी सामने
गट A Coloured text | गट B Coloured text | गट C Coloured text | गट D |
ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका स्कॉटलंड नेदरलँड्स |
श्रीलंका भारत बांगलादेश बर्म्युडा |
न्यूझीलंड इंग्लंड केन्या कॅनडा |
पाकिस्तान वेस्ट इंडीज झिम्बाब्वे आयर्लंडColoured text |
सुपर ८
ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका |
श्रीलंका बांगलादेश |
न्यूझीलंड इंग्लंड |
आयर्लंड वेस्ट इंडीज |
उपांत्य सामना
सामना | विजेता |
ऑस्ट्रेलियाColoured विरुद्ध Coloured text दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया |
श्रीलंकाColoured text विरुद्धColoured text न्यूझीलंड | श्रीलंका |
अंतिम सामना
सामना | विजेता |
ऑस्ट्रेलियाColoured text विरुद्ध Coloured text श्रीलंका | ऑस्ट्रेलिया |
साखळी सामने
[संपादन]सुपर ८ फेरीत गेलेले संघ |
गट A
[संपादन]या गटात ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे दोन दिग्गज संघ तसेच स्कॉटलंड व नेदरलँड्स हे दोन कमी प्रतीचे संघ होते. अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाने सगळ्यांचा धुव्वा उडवला व सहजपणे सुपर ८ मध्ये प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेलाही ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना वगळता विनासायास प्रवेश मिळाला पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरल्यामुळे त्यांना सुपर ८मध्ये ० गुण घेउन जावे लागले. याचा अप्रत्यक्ष परिणाम ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका लढत उपांत्य फेरीतच झाली.
संघ | गुण | सा | वि | स | हा | अनि | ने.र.रे. |
ऑस्ट्रेलिया | ६ | ३ | ३ | ० | ० | ० | ३.४३३ |
दक्षिण आफ्रिका | ४ | ३ | २ | ० | १ | ० | २.४०३ |
नेदरलँड्स | २ | ३ | १ | ० | २ | ० | −२.५२७ |
स्कॉटलंड | ० | ३ | ० | ० | ३ | ० | −३.७९३ |
मैदान - वॉर्नर पार्क मैदान, बस्सेटेर्री, सेंट किट्स आणि नेविस
तारीख | संघ Colour ed tex t | वि / हा | संघ Colour ed tex t | सामनावीर |
बुधवार १४ मार्च २००७ Colour tex t |
ऑस्ट्रेलिया ३३४/६ (५० षटके) |
वि Colour tex t |
स्कॉटलंड १३१/१० (४०.१ षटके) |
रिकी पॉॅंटिंग (ऑस्ट्रे.) (११३ धावा) |
शुक्रवार १६ मार्च २००७ Colour tex t |
दक्षिण आफ्रिका ३५३/३ (४० षटके) |
वि Colour tex t |
नेदरलँड्स १३२/९ (४० षटके) |
हर्शल गिब्स (द.आ.) (७२ धावा) |
रविवार १८ मार्च २००७ Colour tex t |
ऑस्ट्रेलिया ३५८/५ (५० षटके) |
वि Colo |
नेदरलँड्स १२९/१० (२६.५ षटके) |
ब्रॅड हॉज (ऑस्ट्रे.) (१२३ धावा) |
मंगळवार २० मार्च २००७ Colour tex t |
दक्षिण आफ्रिका १८८/३ (२३.२ षटके) |
वि Colo |
स्कॉटलंड १८६/८ (५० षटके) |
ग्रेम स्मिथ (द.आ.) (९१ धावा) |
गुरुवार २२ मार्च २००७ Colo |
स्कॉटलंड १३६/१० (३४.१ षटके) |
हा Colo |
नेदरलँड्स १४०/२ (२३.५ षटके) |
बिली स्टेलींग (नेद.) (३ बळी) |
शनिवार २४ मार्च २००७ | ऑस्ट्रेलिया ३७७/६ (५० षटके) |
वि | दक्षिण आफ्रिका २९४/१० (४८.० षटके) |
मॅथ्यू हेडन (ऑ.) (१०१ धावा) |
गट B
[संपादन]स्पर्धेच्या सुरुवातीपासुनच हा गट सगळ्यात चुरशीचा मानला जात होता. भारत व श्रीलंका या बलाढ्य संघाबरोबरच बांगलादेशही आपली कुवत अजमावणार होता. बर्म्युडाला जरी फारशी आशा नसली तरी ते कितपत झगडतात याची उत्सुकता होती. गटाच्या दुसऱ्याच सामन्यात बांगलादेशने भारताला हरवून सनसनाटी फैलावली. जरी भारताने नंतर बर्म्युडाविरुद्ध उच्चांकी स्कोर केला तरी बांगलादेशविरुद्धची हार त्यांना महागात पडली व सुपर ८मध्ये प्रवेश न करताच भारतीय संघ स्पर्धेबाहेर पडला. श्रीलंका २ तर बांगलादेश ० गुण घेउन सुपर ८मध्ये पोचले.
संघ | गुण | सा | वि | स | हा | अनि | ने.र.रे. |
श्रीलंका | ६ | ३ | ३ | ० | ० | ० | +३.४९३ |
बांगलादेश | ४ | ३ | २ | ० | १ | ० | −१.५२३ |
भारत | २ | ३ | १ | ० | २ | ० | +१.२०६ |
बर्म्युडा | ० | ३ | ० | ० | ३ | ० | −४.३४५ |
मैदान - क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ़ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो
तारीख | संघ Colour ed tex t | वि / हा | संघ Colour ed tex t | सामनावीर |
गुरुवार १५ मार्च २००७ Col |
श्रीलंका ३२१/६ (५० षटके) |
वि Col |
बर्म्युडा ७८/१०(२४.४ षटके) |
माहेला जयवर्दने (श्री.) (८५ धावा) |
शनिवार १७ मार्च २००७ Col |
भारत १९१/१० (४९.३ षटके) |
हा Col |
बांगलादेश १९२/५ (४८.३ षटके) |
Col |
सोमवार १९ मार्च २००७ Col |
भारत ४१३/५(५० षटके) |
वि Col |
बर्म्युडा १५६ /१०(४३.१ षटके) |
विरेंद्र सेहवाग (भा.) (११४ धावा) |
बुधवार २१ मार्च २००७* | श्रीलंका ३१८/४(५० षटके) |
वि | बांगलादेश §१ ११२/१०(३७.० षटके) |
सनथ जयसूर्या(श्री.) १०९ (८७) धावा |
शुक्रवार २३ मार्च २००७ | भारत १८५/१० (४३.३ षटके) |
हा | श्रीलंका २५४/६(५० षटके) |
मुथिया मुरलीधरन(श्री.) (३/४१) |
रविवार २५ मार्च २००७ | बर्म्युडा ९४/९ (२१ षटके) |
हा | बांगलादेश ९६/३ (१७.३ षटके)§२ |
मोहम्मद अशरफुल(बां.) २९(३२) धावा. |
§१ पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी ४६ षटकांमध्ये ३११ धावांचे लक्ष्य बांगलादेशसाठी ठेवण्यात आले.
§२ पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी २१ षटकांमध्ये ९६ धावांचे लक्ष्य बांगलादेशसाठी ठेवण्यात आले.
गट C
[संपादन]यागटातील २ पूर्ण सदस्यांपैकी न्यू झीलँड सुपर ८मध्ये पोचतील याची खात्री होतीच. चुरस होती ती मरगळलेल्या इंग्लंड व केन्या मध्ये दुसरे स्थान पटकावण्याची. गट B प्रमाणे येथे धक्कादायक असे काहीही घडले नाही व न्यू झीलँड व इंग्लंड सुपर ८मध्ये गेले. कॅनडाने केन्याविरुद्ध लढत रंगवली पण केन्याने त्यांना हरवले.
संघ | गुण | सा | वि | स | हा | अनि | ने.र.रे. |
न्यूझीलंड | ६ | ३ | ३ | ० | ० | ० | +२.१३८ |
इंग्लंड | ४ | ३ | २ | ० | १ | ० | +०.४१८ |
केन्या | २ | ३ | १ | ० | २ | ० | −१.१९४ |
कॅनडा | ० | ३ | ० | ० | ३ | ० | −१.३८९ |
मैदान - बीसेजौर मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया
तारीख | संघ Colour ed tex t | वि / हा | संघ Colour ed tex t | सामनावीर |
बुधवार १४ मार्च २००७ Cot |
केन्या २०३/३ (४३.२ षटके) |
वि Cot |
कॅनडा १९९ (५० षटके) |
स्टीव टिकोलो (केन्या) (७२ धावा, २ बळी) |
शुक्रवार १६ मार्च २००७ Cot |
इंग्लंड २०९/७ (५० षटके) |
हा | न्यू झीलँड २१०/४ (४१ षटके) |
स्कॉट स्टायरीस(न्यूझी.) (८७ धावा, २ बळी) |
रविवार १८ मार्च २००७ Cot |
इंग्लंड २७९/६ (५० षटके) |
वि Cot |
कॅनडा २२८/७ (५० षटके) |
पॉल कॉलिंगवुड (इ.) (६२ धावा) |
मंगळवार २० मार्च २००७ Cot |
न्यू झीलँड ३३१/७ (५० षटके) |
वि Cot |
केन्या १८३/१० (४९.२ षटके) |
रॉस टेलर (न्यू.) (८५ धावा) |
गुरुवार २२ मार्च २००७ Cot |
न्यू झीलँड ३६३/५ (५० षटके) |
वि Cot |
कॅनडा २४९/९ (४९.२ षटके)§१ |
लू व्हिंसेंट (न्यू.) (१०१ धावा) |
शनिवार २४ मार्च २००७ | इंग्लंड १७७/३ (३३ षटके) |
वि | केन्या १७७/१० (४३ षटके)§२ |
एड जॉईस (इं.) (७५ धावा) |
§१ कॅनडाच्या सुनील धनीरामला सामन्यातून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आणि तो पुन्हा फलंदाजीसाठी येऊ शकला नाही.
§२ पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचाच होता.
गट D
[संपादन]गट B मधून भारत बाहेर पडणे हे जरी धक्कादायक असले तरी असे काहीसे घडण्याची अंधूक शक्यता आधीपासूनच होती. गट Dची रचना पाकिस्तानच्या पथ्यावरच पडल्यासारखे होते. इतर तीन पैकी आयर्लंड आपला पहिला विश्वचषक खेळत होते. झिम्बाब्वे संघाला (संघेतर) राजकारणामुळे जणू वाळवीच लागली होती तर यजमान वेस्ट इंडीजलाही चाणाक्ष व हुकमी खेळी करणाऱ्या खेळाडूंची कमतरता भासत होती. लक्ष होते या तीनपैकी कोणता संघ दुसरे स्थान मिळवतो यावर. पण प्रत्यक्षा आयर्लंडने आधी झिम्बाब्वे बरोबरचा सामना समसमान सोडवला व नंतर पाकिस्तानला झणझणीत चपराक मारीत हरवले. सेंट पॅट्रिक दिनी खेळलेल्या या सामन्यात आयर्लंडने अतिबलाढ्य अशा पाकिस्तानला नामोहरम केले व सुपर ८मध्ये प्रवेश केला. यजमान वेस्ट इंडीजनेही पाकिस्तानला हरवले व पुढच्या फेरीत जागा मिळवली.
संघ | गुण | सा | वि | स | हा | अनि | ने.र.रे. |
वेस्ट इंडीज | ६ | ३ | ३ | ० | ० | ० | +०.७६४ |
आयर्लंड | ३ | २ | १ | १ | १ | ० | -०.०९२ |
पाकिस्तान | २ | ३ | १ | ० | २ | ० | +०.०८९ |
झिम्बाब्वे | १ | ३ | ० | १ | २ | ० | −०.८८६ |
मैदान - सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका
तारीख | संघ Colour ed tex t | वि / हा | संघ Colour ed tex t | सामनावीर |
मंगळवार १३ मार्च २००७ Codtext |
वेस्ट इंडीज २४१/९ (५० षटके) |
वि Codtext |
पाकिस्तान १८७/१० (४७.२ षटके) |
ड्वेन स्मिथ (वे.ई.) (३२ धाव, ३ बळी) |
गुरुवार १५ मार्च २००७ Codtext |
झिम्बाब्वे २२१/१० (५० षटके) |
समसमान Codtext |
आयर्लंड २२१/९ (५० षटके) |
जेरेमी ब्रे (आय.) (११५ धावा) |
शनिवार १७ मार्च २००७ Codtext |
पाकिस्तान १३२/१०(४५.४ षटके) |
हा Codtext |
आयर्लंड १३३/७ (४१.४ षटके) |
नील ओ'ब्रायन (आय.) (७२ धावा) |
सोमवार १९ मार्च २००७ Codtext |
वेस्ट इंडीज २०४/४ (४७.५ षटके) |
वि Codtext |
झिम्बाब्वे २०२/५ (५० षटके) |
शॉन विल्यम्स (झि.) (७० धावा) |
बुधवार २१ मार्च २००७ Codtext |
झिम्बाब्वे §१ ९९/१० (१९.१ षटके) |
हा Codtext |
पाकिस्तान ३४९/१० (४९.५ षटके) |
इमरान नझिर (पा.) (१६० धावा) |
शुक्रवार २३ मार्च २००७ | वेस्ट इंडीज १९०/२ (३८.१ षटके) |
वि | आयर्लंड १८३/८ (४८.० षटके)§२ |
शिवनारायण चंदरपॉल (वे.ई.) (१०१ धावा) |
§१ - पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी २० षटकांमध्ये १९३ धावांचे लक्ष्य झिम्बाब्वे साठी ठेवण्यात आले.
§२ - पावसामुळे हा सामना ४८ षटकांचाच झाला होता.
सुपर ८ सामने
[संपादन]उपांन्त्य सामने खेळणारे संघ |
संघ | गुण | सा | वि | स | हा | अनि | ने.र.रे. | गु.पुढे |
ऑस्ट्रेलिया | १४ | ७ | ७ | ० | ० | ० | २.४ | २ |
श्रीलंका | १० | ७ | ५ | ० | २ | ० | १.४८३ | २ |
न्यूझीलंड | १० | ७ | ५ | ० | २ | ० | ०.२५३ | २ |
दक्षिण आफ्रिका | ८ | ७ | ४ | ० | ३ | ० | ०.३१ | ० |
इंग्लंड | ६ | ७ | ३ | ० | ४ | ० | −०.३९४ | ० |
वेस्ट इंडीज | ४ | ७ | २ | ० | ५ | ० | −०.५६६ | २ |
बांगलादेश | २ | ७ | १ | ० | ६ | ० | −१.५१४ | ० |
आयर्लंड | २ | ७ | १ | ० | ६ | ० | −१.७३ | ० |
तारीख | संघ Colouredtext | वि / हा | संघ Colouredtext | सामनावीर | स्थळ |
मंगळवार २७ मार्च २००७ Cot |
वेस्ट इंडीज २१९/१० (४५.३ षटके)$1 |
हा Cot |
ऑस्ट्रेलिया ३२२/६ (५० षटके) |
मॅथ्यू हेडन (ऑ.) (१५८ धावा) |
§1 Cot |
बुधवार २८ मार्च २००७ Cot |
दक्षिण आफ्रिका २१२/९ (४८.२ षटके) |
वि Cot |
श्रीलंका २०९/१० (४९.३ षटके) |
शार्ल लॅन्गेवेल्ड्ट (द.आ.) (५ बळी) |
§2 Cot |
गुरुवार २९ मार्च २००७ Cot |
वेस्ट इंडीज १७७/१० (४४.४ षटके) |
हा Cot |
न्यूझीलंड १७९/३ (३९.२ षटके) |
जेकब ओराम(न्यू.) (३ बळी) |
§1 Cot |
शुक्रवार ३० मार्च २००७ Cot |
आयर्लंड २१८/१० (४८.१ षटके) |
हा Cot |
इंग्लंड २६६/७ (५० षटके) |
पॉल कॉलिंगवुड (इ.) (९० धावा, १ बळी) |
§2 |
शनिवार ३१ मार्च २००७ $2 |
ऑस्ट्रेलिया १०६/० (१३.५ षटके) |
वि Cot |
बांगलादेश १०४/६ (२२ षटके) |
ग्लेन मॅक्ग्राथ (ऑ.) (३ बळी) |
§1 |
रविवार १ एप्रिल २००७ Cot |
वेस्ट इंडीज १९०/१० (४४.३ षटके) |
हा Cot |
श्रीलंका ३०३/५ (५० षटके) |
सनथ जयसुर्या (११५ धावा, ३ बळी) |
§2 |
सोमवार २ एप्रिल २००७ Cot |
बांगलादेश १७४/१० (४८.३ षटके) |
हा Cot |
न्यूझीलंड १७८/१ (२९.२ षटके) |
शेन बॉन्ड (न्यू.) (२ बळी) |
§1 Cot |
मंगळवार ३ एप्रिल २००७ Cot |
आयर्लंड १५२/८ (३५ षटके) |
हा Cot |
दक्षिण आफ्रिका १६५/३ (३१.३ षटके) |
जॅकस कॅलीस (द.आ.) (६६ धावा) |
§2 Cot |
बुधवार ४ एप्रिल २००७ Cot |
इंग्लंड २३३/८ (५० षटके) |
हा Cot |
श्रीलंका २३५/१० (५० षटके) |
रवी बोपारा (इ.) (५२ धावा) |
§1 |
शनिवार७ एप्रिल २००७ Cot |
बांगलादेश २५१/८ (५० षटके) |
वि Cot |
दक्षिण आफ्रिका १८४/१० (४८.४ षटके) |
मोहम्मद अशरफुल (बा.) (८७ धावा) |
§2 Cot |
रविवार ८ एप्रिल २००७ Cot |
ऑस्ट्रेलिया २४८/३ (४७.२ षटके) |
वि Cot |
इंग्लंड २४७/१० (४९.५ षटके) |
शॉन टेट (ऑ.) (३ बळी) |
§1 Cot |
सोमवार ९ एप्रिल २००७ Cot |
आयर्लंड १३४/१०(३७.४ षटके) |
हा Cot |
न्यूझीलंड २६३/८ (५० षटके) |
पीटर फुल्टन(न्यू.) (८३ धावा) |
§2 Cot |
मंगळवार १० एप्रिल २००७ Cot |
वेस्ट इंडीज २८९/९ (५० षटके) |
हा Cot |
दक्षिण आफ्रिका ३५६/४ (५० षटके) |
ए.बी. डी व्हिलियर्स (द.आ.) (१४६ धावा) |
§3 Cot |
बुधवार ११ एप्रिल २००७ Cot |
बांगलादेश १३४/१० (३७.२ षटके) |
हा Cot |
इंग्लंड १४७/६ (४४.५ षटके) |
साजिद महमूद (इं.) (३ बळी) |
§4 Cot |
गुरुवार १२ एप्रिल २००७ Cot |
न्यूझीलंड २१९/७ (५० ओवेर्स) |
हा Cot |
श्रीलंका २२२/४ (४५.१ ओवेर्स) |
चामिंडा वास(श्री.) (३ बळी) |
§3हा Cot |
शुक्रवार १३ एप्रिल २००७ Cot |
ऑस्ट्रेलिया ९२/१ (१२.२ षटके) |
वि Cot |
आयर्लंड ९१/१० (३० षटके) |
ग्लेन मॅकग्रा(ऑ.) (३ बळी) |
§4 Cot |
शनिवार १४ एप्रिल २००७ Cot |
दक्षिण आफ्रिका १९३/७ (५० षटके) |
हा Cot |
न्यूझीलंड १९६/५ (४८.२ षटके) |
क्रेग मॅकमिलन (न्यू.) (३८ धावा, ३ बळी) |
§3 Cot |
रविवार १५ एप्रिल २००७ Cot |
बांगलादेश |
हा Cot |
आयर्लंड २४३/७ (५० षटके) |
विलियम पोर्टफिल्ड (आय.) (८५ धावा) |
§4 Cot |
सोमवार १६ एप्रिल २००७ Cot |
ऑस्ट्रेलिया २३२/३ (४२.४ षटके) |
वि Cot |
श्रीलंका २२६/१० (४९.४ षटके) |
नेथन ब्रॅकेन (ऑ.) (४ बळी) |
§3 Cot |
मंगळवार १७ एप्रिल २००७ Cot |
दक्षिण आफ्रिका १५७/१ (१९.२ षटके) |
वि Cot |
इंग्लंड १५४/१० (४८ षटके) |
अँड्रु हॉल (द.आ.) (५ बळी) |
§4 Cot |
बुधवार १८ एप्रिल २००७ Cot |
आयर्लंड ७७/१०(२७.४ षटके) |
हा Cot |
श्रीलंका ८१/२ (१० षटके) |
परवेझ महारूफ (श्री.) (४ बळी) |
§3 Cot |
गुरुवार १९ एप्रिल २००७ Cot |
वेस्ट इंडीज २३०/५ (५० षटके) |
वि Cot |
बांगलादेश १३१/१० (४३.५ षटके) |
रामनरेश सरवान (वे.) (९१ धावा) |
§4 Cot |
शुक्रवार २० एप्रिल २००७ Cot |
ऑस्ट्रेलिया ३४८/६ (५० षटके) |
वि Cot |
न्यूझीलंड १३३/१० (२५.५ षटके) |
मॅथ्यू हेडन (ऑ.) (१०३ धावा.) |
§3 Cot |
शनिवार २१ एप्रिल २००७ Cot |
वेस्ट इंडीज ३००/१० (४९.५ षटके) |
हा Cot |
इंग्लंड ३०१/९ (४९.५ षटके) |
केविन पीटरसन (इ.) (१०० धावा) |
§4 Cot |
मैदान
- §1 - सर विवियन रिचर्ड्स मैदान, सेंट जॉन्स, ॲंटिगा आणि बार्बुडा
- §2 - प्रोव्हिडन्स मैदान, जॉर्ज टाउन, गुयाना
- §3 - क्वीन्स पार्क, सेंन्ट जॉर्ज, ग्रेनेडा
- §4 - किंग्स्टन ओव्हल, बार्बाडोस
$1 - पावसामुळे वेस्ट इंडीज संघाने फलंदाजी बुधवार २८ मार्च २००७ रोजी केली.
$2 - पावसामुळे हा सामना २२ षटकांचा करण्यात आला.
उपांत्य, अंतिम फेऱ्या
[संपादन]उपांत्य फेरी | अंतिम फेरी | |||||||
१ | ऑस्ट्रेलिया | १५३/३ (३१.३ षटके) | ||||||
४ | दक्षिण आफ्रिका | १४९/१० (४३.५ षटके) | ||||||
१ | ऑस्ट्रेलिया | २८१/४ (३८ षटके) | ||||||
२ | श्रीलंका | २१५/८ (३६ षटके) | ||||||
२ | श्रीलंका | २८९/५ (५० षटके) | ||||||
३ | न्यू झीलँड | २०८/१० (४१.४ षटके) |
उपांत्य सामने
[संपादन]तारीख | संघ Colouredtext | वि / हा | संघ Colouredtext | सामनावीर |
मंगळवार २४ एप्रिल २००७ Cot |
श्रीलंका २८९/५ (५० षटके) |
वि Cot |
न्यूझीलंड २०८/१० (४१.४ षटके) |
माहेला जयवर्दने (श्री.) (११५ धावा) |
गुरुवार २५ एप्रिल २००७ Cot |
ऑस्ट्रेलिया १५३/३ (३१.३ षटके) |
वि Cot |
दक्षिण आफ्रिका १४९/१० (४३.५ षटके) |
ग्लेन मॅकग्रा (ऑ.) (३ बळी) |
मैदान
- उपांत्य सामना १ - सबाइना पार्क, जमैका
- उपांत्य सामना २ - बीसेजौर मैदान, ग्रॉस इस्लेट, सेंट लुसिया
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
विक्रम
[संपादन]सर्वात जास्त धावा
[संपादन]- ६५९ मॅथ्यू हेडन
- ५४८ माहेला जयवर्दने
- ५३९ रिकी पॉंटिंग
सर्वात जास्त बळी
[संपादन]- २६ ग्लेन मॅकग्रा
- २३ मुथिया मुरलीधरन , शॉन टेट
- २१ ब्रॅड हॉग
सर्वात जास्त बळी (यष्टिरक्षक)
[संपादन]- १७ ऍडम गिलख्रिस्ट
- १५ कुमार संघकारा
- १४ ब्रेन्डन मॅककुलम
सर्वात जास्त झेल (क्षेत्ररक्षक)
[संपादन]बॉब वूल्मरचा मृत्यू
[संपादन]१८ मार्च २००७ रोजी पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर त्यांच्या हॉटेलच्या खोलीत मृत स्थितीत सापडले. या घटनेच्या एक दिवस आधी त्यांचा संघ आयर्लंड विरूद्धच्या सामन्यात हरल्यामुळे विश्वचषक स्पर्धेतून बाद झाला होता. पोलीस चौकशीत बॉब वूल्मर यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा खून गळा दाबून झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. जून ५, इ.स. २००७ रोजी जमैका पोलिसांनी जाहीर केले की वूल्मर यांचा मृत्यू म्हणजे खून नव्हताच.
बाह्य दुवे
[संपादन]- CWC 2007
- Link 1 Archived 2007-02-16 at the Wayback Machine.