Jump to content

१९४८ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९४८ हिवाळी ऑलिंपिक
V हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर सेंट मॉरिट्झ
ग्राउब्युंडन
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड


सहभागी देश २८
सहभागी खेळाडू ६६९
स्पर्धा २२, ४ खेळात
समारंभ
उद्घाटन जानेवारी ३०


सांगता फेब्रुवारी ८
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष एन्रिको सेलियो
मैदान सेंट मॉरिट्झ ऑलिंपिक आइस रिंक


◄◄ १९३६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९५२ ►►


१९४८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची पाचवी आवृत्ती होती. ही स्पर्धा स्वित्झर्लंड देशाच्या सेंट मॉरिट्झ ह्या गावामध्ये जानेवारी ३० ते फेब्रुवारी ८ दरम्यान खेळवण्यात आली. १९३६नंतर १२ वर्षांच्या प्रदीर्घ काळाने ही स्पर्धा प्रथमच भरवण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात पराभूत जर्मनीजपानना ह्या स्पर्धेचे आमंत्रण नव्हते.

दुसऱ्या महायुद्धामुळे युरोप व इतरत्र देशांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्यामुळे ह्या स्पर्धेच्या आयोजनात अनेक आर्थिक अडचणी आल्या. तसेच सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडे पुरेशी साधने नव्हती.

यजमान शहर

[संपादन]
map of Switzerland with a green dot showing the location of St. Moritz in the south-east corner of the country
map of Switzerland with a green dot showing the location of St. Moritz in the south-east corner of the country
सेंट मॉरिट्झ
सेंट मॉरिट्झचे स्वित्झर्लंडमधील स्थान

ह्या स्पर्धेसाठी आल्प्स पर्वतामधील सेंट मॉरिट्झ ह्या शहराची निवड सप्टेंबर १९४६ मध्ये करण्यात आली. अमेरिकेमधील लेक प्लॅसिड हे शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होते परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर एका तटस्थ देशामध्येच ही स्पर्धा घेण्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने ठरवले.

सहभागी देश

[संपादन]

खालील २८ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

सहभागी देश

खालील सहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्ता

[संपादन]
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
नॉर्वे नॉर्वे १०
स्वीडन स्वीडन १०
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड १०
अमेरिका अमेरिका
फ्रान्स फ्रान्स
कॅनडा कॅनडा
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया
फिनलंड फिनलंड
बेल्जियम बेल्जियम
१० इटली इटली

बाह्य दुवे

[संपादन]