हैदराबाद डेक्कन रेल्वे स्थानक
Appearance
हैदराबाद रेल्वे स्थानक तथा नामपल्ली रेल्वे स्थानक हे तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबादमधील एक रेल्वे स्थानक आहे. हैदराबादच्या नामपल्ली भागात स्थित असलेले हे स्थानक सिकंदराबाद रेल्वे स्थानकासह हैदराबाद महानगरामधील प्रमुख स्थानक आहे. येथून भारतामधील बहुतेक मोठ्या शहरांसाठी प्रवासी रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
१८७४ सालापासून चालू असलेले हैदराबाद स्थानक भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे ह्या विभागाच्या अखत्यारीत येते.
हैदराबादमधून सुटणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्या
[संपादन]- हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्सप्रेस
- हैदराबाद-नवी दिल्ली आंध्र प्रदेश एक्सप्रेस
- हैदराबाद-हजरत निजामुद्दीन दक्षिण एक्सप्रेस
- हैदराबाद-चेन्नई चारमिनार एक्सप्रेस
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत