भारतातील राजकीय पक्ष
१५ मार्च २०१९ रोजी, भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार भारतामध्ये एकूण २,३३४ राजकीय पक्ष असून, त्यापैकी ८ राष्ट्रीय पक्ष, २६ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर २,३०१ नोंदणीकृत पक्ष आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण १४५ नोंदणीकृत पक्ष आणि २ राज्यस्तरीय (मनसे व शिवसेना) पक्ष आहेत.
भारतात २३३४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात.भारतीय शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय जनता पक्ष व नॅशनल पीपल्स पार्टी असे फक्त आठ राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.
मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे.
राष्ट्रीय पक्ष
[संपादन]नोंदणीकृत पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते जेव्हा खाली सूचीबद्ध केलेल्या तीनपैकी कोणतीही एक अटी पूर्ण केली असेल:
- पक्षाला लोकसभेत किमान तीन वेगवेगळ्या राज्यांतून दोन टक्के जागा मिळाल्या आहे.
- लोकसभा किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत, पक्ष कोणत्याही चार किंवा अधिक राज्यांमध्ये सहा टक्के मते मिळवतो आणि त्याव्यतिरिक्त लोकसभेच्या चार जागा जिंकतो.
- चार राज्यांत पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळते.
एप्रिल २०२३ मध्ये खालीलपैकी ६ पक्ष हे राष्ट्रीय पक्ष घोशीत झाले. तेव्हाच अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे या यादीतून वगळण्यात आले.[१]
क्र. | निवडणूक चिन्ह | ध्वज | पक्ष | संक्षेप | स्थापना [२] | पक्ष नेता | राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकार | जागा | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
मुख्यमंत्री | युती भागीदार | लोकसभा | राज्यसभा | |||||||
१ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | INC (काँ) | २८ डिसेंबर १८८५ ( १३८ वर्षे, ३१९ दिवस) |
मल्लिकार्जुन खरगे (२०२२ पासून) |
४ / ३१
|
३ / ३१
|
५० / ५४३
|
३१ / २४५
| ||
२ | भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) | CPI(M) (भाकप(मा)) | ७ नोव्हेंबर १९६४ ( ६० वर्षे, ४ दिवस) |
सीताराम येचुरी (२०१५ पासून) |
१ / ३१
|
२ / ३१
|
३ / ५४३
|
५ / २४५
| ||
३ | भारतीय जनता पक्ष | BJP (भाजप/भाजपा) | ६ एप्रिल १९८० ( ४४ वर्षे, २१९ दिवस) |
जगत प्रकाश नड्डा (२०२० पासून) |
१० / ३१
|
६ / ३१
|
३०० / ५४३
|
९३ / २४५
| ||
४ | बहुजन समाज पक्ष | BSP (बसप/बसपा) | १४ एप्रिल १९८४ ( ४० वर्षे, २११ दिवस) |
मायावती (२००१ पासून) |
० / ३१
|
० / ३१
|
९ / ५४३
|
१ / २४५
| ||
५ | आम आदमी पक्ष | AAP (आप) | २६ नोव्हेंबर २०१२ ( ११ वर्षे, ३५१ दिवस) |
अरविंद केजरीवाल (२०१२ पासून) |
२ / ३१
|
० / ३१
|
१ / ५४३
|
१० / २४५
| ||
६ | नॅशनल पीपल्स पार्टी | NPP | ६ जानेवारी २०१३ ( ११ वर्षे, ३१० दिवस) |
कॉनराड संगमा (२०१६ पासून) |
१ / ३१
|
३ / ३१
|
१ / ५४३
|
१ / २४५
|
राज्यस्तरीय पक्ष
[संपादन]नोंदणीकृत पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली जाते, जर त्याने खाली सूचीबद्ध केलेल्या पाच अटींपैकी कोणतीही एक पूर्ण केली असेल:[३]
- एखाद्या पक्षाला राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या वैध मतांपैकी किमान सहा टक्के मते मिळाली पाहिजेत आणि त्या राज्य विधानसभेत किमान दोन जागा जिंकल्या पाहिजेत.
- एखाद्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या वैध मतांपैकी किमान सहा टक्के मते मिळाली पाहिजेत आणि लोकसभेत किमान एक जागा जिंकली पाहिजे.
- एखाद्या पक्षाने विधानसभेच्या एकूण जागांच्या किमान तीन टक्के किंवा किमान तीन जागा जिंकल्या पाहिजेत, जे कधीही जास्त असेल.
- एखाद्या पक्षाने लोकसभेत प्रत्येक 25 जागांसाठी किमान 1 जागा जिंकली पाहिजे किंवा त्या राज्याला दिलेल्या कोणत्याही अंशासाठी.
- उदारीकरणाच्या निकषांतर्गत, राज्यात मतदान झालेल्या एकूण वैध मतांपैकी आठ टक्के किंवा त्याहून अधिक मते मिळाल्यास तो राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळण्यास पात्र असेल असे आणखी एक कलम.
मान्यताप्राप्त राज्यस्तरीय किंवा प्रादेशिक पक्षांची यादी:
अन्य माहिती
[संपादन]२०१८ साली,
- देशातील ४०४ पक्षांच्या नावात 'भारत किंवा भारतीय' हे शब्द होते.
- देशातील १५३ पक्षांच्या नावात 'समाज' हा शब्द होता.
- देशातील १३२ पक्षांच्या नावात 'जनता किंवा प्रजा' हे शब्द होते.
- देशातील ५७ पक्षांच्या नावात 'आम किंवा युवा' हे शब्द होते.
- देशातील १२ पक्षांच्या नावात 'गांधी' हा शब्द होता.
- देशातील ६३ टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक, काँग्रेस किंवा आंदोलन यांपैकी एक शब्द होता.
- देशातील ४० टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांत होते.
- उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. त्या राज्यात ४३३ राजकीय पक्ष होते, म्हणजे साडेचार लाख लोकांमागे एक पक्ष.
- दिल्ली राज्याची लोकसंख्या १.९ कोटी आहे; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लोकांमागे एक पक्ष.
- बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहे, त्या राज्यात १२० पक्ष होते.
- तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष.
- ४.९ कोटी लोकसंख्या असलेल्या आंध्र प्रदेशात ८३ पक्ष होते.
काही 'खास' नावांचे पक्ष :-
- अखिल भारतीय गरीब पार्टी (गाझियाबाद-उत्तर प्रदेश)
- अखिल भारतीय राष्ट्रीय परिवार पार्टी (वाराणसी-उत्तर प्रदेश)
- अंजान आदमी पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
- आजादीका अंतिम आंदोलन दल (रायपूर-छत्तीसगड)
- आधी आबादी पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)
- आप सबकी अपनी पार्टी (विलासपूर-छत्तीसगड)
- आर्थिक व्यवस्था परिवर्तन पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
- ऑल इंडिया गांधी काँग्रेस (बंगलोर-कर्नाटक)
- बेरोजगार आदमी अधिकार पार्टी (फरीदाबाद-हरियाणा)
- भारत की लोक जिम्मेदार पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)
संदर्भ
[संपादन]- ^ "National Parties in India: List of All the Political Parties 2023". JanJagrosh. 11 July 2023.
- ^ "Immigration and Refugee Board of Canada, Country Fact Sheet - India". 2007-05. 2009-08-22 रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;:0
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;State parties
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ a b "Lok Sabha Elections 2014: Know your party symbols!". Daily News and Analysis. 10 April 2014.
- ^ "AIADMK". The Times of India. 14 September 2023 रोजी पाहिले.
- ^ Ogden, Chris (20 June 2019). A Dictionary of Politics and International Relations in India (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 978-0-19-253915-1. 9 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 November 2022 रोजी पाहिले.
All India Anna Dravida Munnetra Kazhagam (Tamil: 'All India Anna Dravidian Progress Federation') A political party. It was established in 1972...
- ^ Price, P. (1996). Revolution and Rank in Tamil Nationalism. The Journal of Asian Studies, 55(2), 359-383. doi:10.2307/2943363
- ^ Pamela Price (1999) Relating to leadership in the Tamil nationalist movement: C.N. Annadurai in person‐centred propaganda, South Asia: Journal of South Asian Studies, 22:2, 149-174, doi:10.1080/00856409908723369
- ^ a b Kannan, Ramya (8 August 2018). "M. Karunanidhi: From health care to community living, his schemes were aimed at social equality". The Hindu. ISSN 0971-751X. 10 August 2019 रोजी पाहिले.
- "Social Equality was Karunanidhi's Focus During Five Terms as Tamil Nadu CM". News18. 11 March 2019. 10 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "Tumultuous transition". 27 May 2017.
- ^ "Why no centre-right political party in India today?". 16 February 2014.
- ^ a b "Encyclopedia Britannica".
- ^ Price, Pamela; Srinivas, Dusi (August 2014). Piliavsky, Anastasia (ed.). "Patronage and autonomy in India's deepening democracy". Cambridge University Press: 217–236. doi:10.1017/CBO9781107296930.011. ISBN 9781107296930.
- ^ "Party constitution". India: All India Forward Bloc. 2017. 22 April 2017 रोजी पाहिले.
- ^ "Though BJP and AIMIM are ideologically apart they share a few similarities".
- ^ "Will fight back to save India's composite culture, Constitution: Asaduddin Owaisi". 26 May 2019.
- ^ "Minority Upliftment". 2023-03-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-12-01 रोजी पाहिले.
- ^ "AIMIM eyes minorities and Dalits in Malda".
- ^ "AIMIM want to confront Hindu nationalism with Indian Constitution: Owaisi". Business Standard India. 8 February 2021.
- ^ "Centrist polity of TRS".
- ^ Hyderabad, K. VENKATESHWARLU in (23 April 2004). "Regionalism and sub-regionalism". Frontline (इंग्रजी भाषेत). 14 September 2020 रोजी पाहिले.
- ^ "One year of Telangana a mixed bag for KCR". The Tribune. 21 July 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 July 2018 रोजी पाहिले.
The Telangana Rashtra Samithi (TRS), led by Chandrasekhar Rao, took over the reins of the new state amid euphoria and high expectations. ... Blending boldness with populism, KCR has earned the reputation for being a tough task master
- ^ a b "Biju Janata Dal". Encyclopædia Britannica.
- ^ "Lok Sabha Elections 2014: Know your party symbols!". Daily News and Analysis. 10 April 2014.
Founded in December 1997, the Biju Janata Dal or the BJD is a regional political party of India. Having split from the larger faction Janata Dal, the party stands by democracy and liberalism.
- ^ Capron, Laurence; Guillén, Mauro (12 October 2006). "Fighting economic nationalism in deals". Financial Times. 10 December 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 May 2018 रोजी पाहिले.
- ^ "IDEOLOGY & FLAG". India: Election Commission of India. 2013. 26 October 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 May 2013 रोजी पाहिले.
- ^ a b "General Programme of CPI(ML)". Communist Party of India (Marxist-Leninist) website (इंग्रजी भाषेत). 6 April 2013. 8 April 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 March 2020 रोजी पाहिले.
- ^ "A coloured scheme of things". Jul 19, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ a b "History". JK Panthers Party. 13 April 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 September 2015 रोजी पाहिले.
- ^ a b PTI (9 November 2010). "SC upholds freeze on delimitation in J&K till 2026". The Hindu.
- ^ "Headlines Today". Panther party MLAs disrupt house in Jammu and Kashmir assembly. 28 August 2014. 26 September 2015 रोजी पाहिले – youtube.com द्वारे.
- ^ Jammu Kashmir Peoples Democratic Party. "Self Rule". 16 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "KM Mani: The man behind the 'Theory of the Toiling Class'". The New Indian Express. 10 April 2019. 20 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "K M Mani honoured at British Parliament Hall". The New Indian Express. 7 September 2012. 20 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Raj Thackeray goes right ahead with 'Hindutva'and development agenda for MNS". CanIndia. 23 January 2020. 19 May 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 October 2021 रोजी पाहिले.
- ^ Bedi, Tarini (2016). The Dashing Ladies of Shiv Sena. SUNY Press. p. 42.
- ^ "Munde still keen on alliance with MNS". Hindustan Times. 2 March 2011.
- ^ a b c "Maharashtra Navnirman Sena". Election MS. 29 March 2019. 2021-01-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-12-01 रोजी पाहिले.
- ^ "How Pakistan Fell in Love With Bollywood". Foreign Policy. 15 March 2010.
- ^ Bidyut Chakrabarty (2014). Communism in India: Events, Processes and Ideologies. Oxford University Press. p. 61. ISBN 978-0-19-997489-4.
- ^ "Indian citizenship act against humanity: Manoj Bhattacharya". prothomalo.com. March 2020.
- ^ Verniers, Gilles (2018). "Conservative in Practice: The Transformation of the Samajwadi Party in Uttar Pradesh". Studies in Indian Politics. 6: 44–59. doi:10.1177/2321023018762675. S2CID 158168430.
- ^ "Left wing triumphs in Uttar Pradesh election". Financial Times. 6 March 2012. 10 December 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
The big winner in the Uttar Pradesh state election was the regional leftwing Samajwadi party
- ^ "Indian MPs held hostage in caste struggle". The Independent. 21 June 1995.
- ^ Singh, Mahendra Prasad; Saxena, Rekha (2003). India at the Polls: Parliamentary Elections in the Federal Phase. Orient Blackswan. p. 78. ISBN 978-8-125-02328-9.
- ^ "Mulayam's son Prateek Yadav attracts eye balls during ride in Rs 5 crore Lamborghini". Zee News. 14 January 2017.
- ^ "SAD aims to widen reach, to contest UP poll". The Tribune. Chandigarh. 8 October 2015. 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 October 2015 रोजी पाहिले.
- ^ Pandher, Sarabjit (3 September 2013). "In post-Independence India, the SAD launched the Punjabi Suba morcha in the 1960s, seeking the re-organisation of Punjab on linguistic basis". The Hindu. 15 September 2015 रोजी पाहिले.
- ^ Grover, Verinder (1996). Encyclopaedia of India and Her States: Himachal Pradesh, Jammu & Kashmir and Punjab, Volume 4. Deep & Deep. p. 578.
- ^ "Parkash Singh Badal calls for 'genuinely federal structure' for country". The Economic Times. 7 December 2014. 10 October 2019 रोजी पाहिले.
- ^ Bharti, Vishav (6 August 2019). "Article 370: SAD 'dumps' its core ideology of federalism". The Tribune. 2019-10-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 October 2019 रोजी पाहिले.
- ^ "This is how Jagan Reddy has turned into a political juggernaut in Andhra". 25 September 2021.
- ^ "No merger of ZNP in ZPM, according to ECI', s list , dated 26 may 2023".