Jump to content

विभीषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बिभीषण या पानावरून पुनर्निर्देशित)

विभीषण (बिभीषण) हा लंकापती रावणाचा धाकटा भाऊ होता. त्याने अधर्म नीतीच्या विरोधात सुरू असलेल्या राम-रावण युद्धामध्ये रामाला मदत केली. बिभीषणाच्या मृुत्यूचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख न आल्याने बिभीषण चिरंजीव (अमर) समजला जातो.

'वैयक्तिक माहिती'


बिभीषण हा विश्रवा ऋषींच्या आठ पुत्रंपैकी एक होता. विश्रवा ऋषींना इलाविदा व कैकसी या पत्न्या होत्या. कैकासिला रावण, कुंभकर्ण, विभिषण, शूर्पणखा ही मुले होती. तसेच इलाविदा हिला कुबेर, खर, दूषण, अहिरावण ही मुले होती. वि विभीषण याला सरमा ही पत्नी होती त्यापासून त्याला त्रिजटा ही मुलगी, त्राणीसेन व नील ही मुले होती.


रामाच्या बाजूने युद्ध


विभिषणाला माहित होते की रावणाची बाजू अधर्माची आहे. म्हणून त्याने रामाची बाजू स्वीकारली. त्याने युद्धामध्ये रामाला विविध लंकेची व रावणाची रहस्ये सांगितली.



'इंद्रजिताच्या वधामध्ये सहाय्य'


मेघनाद याने स्वर्गराज इंद्राला हरवले होते. व बंदी बनवले होते. त्या वेळी ब्रम्हाने त्याला इंद्राला सोडायची विनंती केली. आणि इंद्रजित नाव दिले. आणि वरदान दिले की तो ज्या युद्धाच्या आधी देवीसाठी विशेष यज्ञ करेल, त्या युद्धात त्याला कुणीच हरवू शकत नाही. परंतु जो तो यज्ञ सुरू असताना त्याला ध्वस्त करेल, त्याच्याच हातून त्याचा वध होईल. हे विभिषणाला माहित होते. त्याने हे लक्ष्मणाला सांगितले. इंद्रजित रामायणाचे युद्ध सुरू व्हायच्या आधी रोज यज्ञ करायचा. लक्ष्मणाने त्याचा यज्ञ सुरू असताना ध्वस्त केला. आणि लक्ष्मणाच्याच हातून त्याचा मृत्यू झाला.


रावणाच्या वधात सहाय्य


राम रावणाशी लढत असताना रामाचे बाण निष्फळ होत होते. तेव्हा रावणाचे एक रहस्य विभिषणाने रामाला सांगितले की ब्रम्हाने त्याला अमृत दिले आहे. ते त्याच्या नाभीमध्ये आहे. तेव्हा रामाने रावणाच्या नाभीमध्ये वार केला. आणि रावणाचा मृत्यू झाला.