बाणाई
Appearance
हि खंडोबाची दुसरी बायको ही धनगर समाज्याची असल्याचे मानले जाते, तर काही कथा मध्ये ती धनगरांनी संभाळ केलेली बाणासुराची मुलगी असल्याचे मानतात, ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचे ही मानले जाते. या बाणाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेउन तीच्याघरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला, आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले.