चार्ल्स बॅबेज
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
चार्ल्स बॅबेज (डिसेंबर २६, इ.स. १७९१ - ऑक्टोबर १८, इ.स. १८७१) हे इंग्लिश गणितज्ञ, तत्त्वज्ञानी व यांत्रिकी अभियंता होते. बॅबेज यांना संगणकाची कल्पना प्रथम सुचली. पण त्यांच्या जीवनकालात ते आपल्या कल्पनेस आकार देऊ शकले नाहीत. लंडनच्या वस्तु संग्रहालयात त्यांच्या अपूर्ण संगणकाचे भाग प्रदर्शनास ठेवले आहेत. १९९१ साली चार्ल्स बॅबेज यांच्या कल्पनेतील डिफरन्स इंजिनची यशस्वी प्रतिकृती तयार करण्यात आली. ‘पॅसेज फ्रॉम द लाईफ ऑफ ए फिलॉसॉफर’ हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे.