राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांशी बोलल्यानंतर राज्यातील वर्तमान परिस्थितीवर भूमिका मांडली.
महाविकास आघाडीने अडीच वर्षे उत्तम कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोनासारखे राष्ट्रीय संकट असताना आरोग्य खात्याने अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला नाही असे कोणी म्हणत असेल तर ते राजकीय अज्ञान आहे.
प्रसिद्धी माध्यमांमधून ज्या गोष्टी पुढे येत आहेत, त्या नाकारता येणार नाहीत. पण विधानसभेचे जे सभासद महाराष्ट्राबाहेर गेले, ते पुन्हा राज्यात आल्यानंतर ज्या प्रकारे त्यांना नेले ही वस्तुस्थिती लोकांना सांगतील व ते पुन्हा शिवसेनेसोबत राहतील. त्यानंतर बहुमत कुणाचे आहे, ते सिद्ध होईल.
सरकार अल्पमतात आहे की नाही, हे विधानसभेत सिद्ध होत असते. जेव्हा विधानसभेत फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा हे सरकार बहुमतात असेल, असा मला विश्वास वाटतो.
तसेच अशा प्रकारची स्थिती मी महाराष्ट्रात अनेकदा पाहिली आहे. मला पूर्ण खात्री आहे की यावेळी देखील सरकार आपले बहुमत सिद्ध करेल आणि मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार चालेल हे संपूर्ण देशाला दिसेल.
एकनाथ शिंदे यांनी वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांना एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. माझ्याकडे देशातील सर्व पक्षांची यादी आहे. या यादीत निवडणूक आयोगानुसार देशात सहा अधिकृत राष्ट्रीय पक्ष आहेत.
भाजप, काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे हे सहा पक्ष आहेत. काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी शिंदे यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे उरलेला राष्ट्रीय पक्ष कोणता ते सर्वांना माहीत आहे.
सूरत आणि आसाममध्ये बंडखोर आमदारांची व्यवस्था करणारे जे लोक दिसले ते माझ्या परिचयाचे आहेत. सूरतमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील हे मराठी गृहस्थ आहेत. ते संसदेचे सदस्य असल्यामुळे मी त्यांना ओळखतो. त्यांचा सूरतमधील व्यवस्था करण्यात सहभाग असेल तर याचा अर्थ काय समजायचा?
आसाममध्ये सबंध व्यवस्था तिथल्या राज्य सरकारने केली. आसाम राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना मदत करणारे राज्यात कुणी दिसत नसले तरी आसाममध्ये कोण काय करतंय हे सर्वांना दिसत आहे.
शिवसेना आमदारांना राज्यात तर यावे लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निर्णय हा अँटी डिफेक्शन कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.
त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील याची प्रतिक्रिया उमटेल. त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत. ज्यावेळी छगन भुजबळ शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत १२ ते १६ लोक आले होते.
जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा एक सोडून इतर सर्वांचा पराभव झाला. हा पूर्वीचा अनुभव आहे. जे लोक आसाममध्ये गेले आहेत, त्यांच्यासोबत असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या लोकांना काहीतरी सांगावे म्हणून निधीचा विषय काढला गेला. बाकी त्याला काही अर्थ नाही.
जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत, त्यातील अनेक आमदारांवर केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे किंवा होती. त्याचा परिणाम त्यांच्या निर्णयावर झाला नसेल असे म्हणता येणार नाही.
तसेच या आमदारांना अडीच वर्ष सत्तेत असताना हिंदुत्वाचा मुद्दा अडचणीचा ठरला नव्हता. आज जेव्हा सरकारविरोधात जाण्याची संधी मिळाली तेव्हा हिंदुत्वाचे फक्त कारण पुढे केले जात आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही, असे मला वाटते.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
In the meeting of representatives of various opposition parties held in New Delhi today to deliberate on the candidate for the Presidential Election. We have unanimously chosen Shri Yashwant Sinha as the common candidate of the opposition parties for the Presidential Election.
In his long and distinguished career in public life, Shri Sinha has served the nation in various capacities and he is eminently qualified to uphold the secular and democratic character of the Indian Republic and its constitutional values.
We have given a candidate who can truly serve as the custodian of the constitution & stop the current government from doing further damage to Indian Democracy & India’s social fabric. A committee has been formed to steer Shri Sinha’s campaign which will start working from today.
पिछले दो-ढ़ाई साल में यह तिसरी बार हुआ है। पिछली दो बार विधायक उठाने का काम हुआ। पिछली बार हमारे विधायकों को हरियाणा, गुड़गांव मे रखा गया था। वहाँ से वो निकलकर आये, उसके बाद उद्धव ठाकरे जी का सरकार बना।
पिछले ढ़ाई साल से महाराष्ट्र की सरकार ठिक तरह से चल रही है। कल महाराष्ट्र विधान परिषद का इलेक्शन हुआ। एनसीपी के दो उम्मीदवारों के लिए वोटों का जो कोटा तय किया गया था, वो उन्हें मिला। हमारी पार्टी के विधायकों ने डिसिप्लिन से वोटिंग किया।
हमारी फ्रंट का एक उम्मीदवार जीत नही सका, ये बात सच है। मुंबई वापस जाने के बाद इस पर चर्चा करेंगे। इस में कुछ ना कुछ रास्ता निकलेगा ऐसा मुझे भरोसा है। महाराष्ट्र सरकार की तीन सहयोगी पार्टीयों मे सही तालमेल है।
वानवडी, पुणे येथे महात्मा फुले सांस्कृतिक भवनात 'व्यापाराचे विद्यापीठ' या पुस्तकाचे प्रकाशन करताना आनंद वाटला.
दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक तयार झाले आहे.
व्यापारी समाज हा कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशाच्या विविध प्रांतांतून कित्येक पिढ्या आधी पुणे भागामध्ये येऊन स्थिरावला. महाराष्ट्र भूमी हीच आपली भूमी मानून उद्योग व्यवसायांमध्ये लौकिक कमावला. त्यामुळे पुण्यातील अर्थकारणाला चालना मिळाली.
पुण्याचा शिक्षण क्षेत्रात लौकिक आहेच. व्यापाराचे विद्यापीठ या ग्रंथाच्या प्रकाशनाने व्यापारी क्षेत्राच्या ज्ञानात मोलाची भर घालणारे म्हणून देखील पुणे शहराचा नावलौकिक होईल. या पुस्तकातील प्रत्येकाची जीवनगाथा जिद्द, प्रामाणिकपणा, कष्ट, सकारात्मकता, शिस्त, चिकाटी हे गुण दर्शवते.
काही दिवसांपूर्वी माझी भेट घेण्यासाठी काही लोकांना विनंती केली होती. श्री. दवे यांनी यासंदर्भात वेळ मागितला होता. त्यानंतर आमच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना याची कल्पना देऊन त्यांनाही या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले. #pressconference#Pune
जिल्हाध्यक्षांकडून समजले की, दवेच नाही तर महाराष्ट्रातील अन्य ठिकाणाहूनही अनेक लोक भेट घेण्यासाठी इच्छुक आहे. यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांतून नऊ ते दहा संघटनांचे साधारण ४० लोक आले होते. ज्यामध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आले.
त्यापैकी त्यांच्यात माझ्या पक्षातील काही सहकाऱ्यांनी विधाने केली त्यासंबंधीची अस्वस्थता होती.याबद्दल त्यांना सांगितले की, पक्षांतर्गत त्या विधानांविषयी चर्चा झाली असून अशा पद्धतीने पुन्हा कोणत्याही जाति-धर्मावर न बोलता धोरणात्मक कार्यक्रमावर बोलण्याचा अधिकार आहे असा निर्णय झाला.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या छायाचित्रांमधून त्यांच्या आठवणींना उजाळा देता आला.
विद्यार्थीदशेच्या काळानंतर अनेक वर्षानंतर मला या वास्तूत यायची संधी मिळाली. मुंबईतील काही वास्तू जगप्रसिद्ध आहेत. त्या जगप्रसिद्ध वास्तूंमध्ये मुंबई विद्यापीठाची ही वास्तू अत्यंत महत्त्वाची आहे. इथल्या वास्तूमध्ये हा आगळावेगळा कार्यक्रम आज इथे घेतला जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन तसेच त्यांच्या नावाने काही अभ्यासक्रमही इथे सुरू करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं. आमचे त्यांच्याशी अतिशय घनिष्ट संबंध होते, तसेच आमच्यात संघर्षही होता.
प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. गेली अनेक वर्षे नेत्रचिकित्सा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. तात्याराव लहानेंमार्फत आता हे नवीन नेत्रालय उभे राहत आहे.
ही आपल्या राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या नवीन नेत्रालयामार्फतही गरजूंना दृष्टिदान करण्याचे काम डॉ. लहाने अखंडपणे करत राहतील, असा माझा ठाम विश्वास आहे.
डॉ. लहानेंची एक इच्छा होती की, मुंबईमध्ये एक उत्तम नेत्रालय असावे. त्यांची ती इच्छा आज पूर्ण झाली. या नेत्रालयाचे नाव त्यांनी रघुनाथ नेत्रालय ठेवले आहे. रघुनाथराव हे माझे सहकारी होते. सध्या ते हयात नाहीत.