, 10 tweets, 6 min read Read on Twitter
बऱ्याच दिवसांनंतर आज कोल्हापूरच्या गांधी मैदानात भाषण केले. कोल्हापूरचे लोक जागरुक आहेत. योग्य असेल तर कोल्हापूरचे लोक पाठिंबा देतात, योग्य नसेल तर जागा दाखवतात.
ही नगरी शाहुंची आहे, ही नगरी ताराराणींची नगरी आहे, ही इतिहास तयार करणारी नगरी आहे. एक-दोन एकरांमध्ये आपल्या कुटुंबासह देशभराची भूक घालवण्याची धमक इथल्या शेतकऱ्यामध्ये आहे.
इथल्या कामगारांनी बनवलेल्या वस्तू आज जगभरात वापरल्या जातात. हा जिल्हा माझ्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. मी आज जे काही आहे ते माझ्या आईमुळे आहे. त्या मातेचा जन्मदेखील याच कोल्हापुरात आला आहे.
#Kolhapur #NCP2019 #LokSabhaElections2019
आमच्या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी मी इथे आलो आहे. अत्यंत कमी वेळात सर्व खासदारांच्या मनात जागा करणारे @dbmahadik आणि आयुष्यभर इथल्या शेतकऱ्यांसाठी झटणारे राजू शेट्टी. मला अभिमान आहे की कोल्हापूरची जनता या नेतृत्वाच्या पाठिशी खंबीर उभी आहे.
आज देशात एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदी देशाला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवत आहे. या भागात उद्योग यावा यासाठी वसंतराव, शंकरराव चव्हाण, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी अत्यंत कष्ट घेतले. आज एकही नवा कारखाना या भागात आला नाही.
#Kolhapur #NCP2019
तरूणांना रोजगार नाही, बेकारी वाढली म्हणून देशातला तरुण नैराश्यात आहे. शेतकऱ्यांची इतकी दैना कधी झाली नव्हती तितकी दैना मोदींच्या काळात होत आहे. मोदी त्यावर काहीच बोलत नाही. ते बोलतात गांधी कुटुंबावर, पवार कुटुंबावर.
#Kolhapur #NCP2019
आज अकलूजमध्ये मोदींनी माझ्यावर टीका केली. या भागात मी सहकार उभा केला त्यावरून त्यांनी टीका केली. सत्तेचा वापर जर शेतकऱ्यांच्या पिकाला दर मिळावा यासाठी कष्ट घेतले तर चूक केली का?
मोदींना माहिती नाही मी कोणत्याही साखर कारखान्यावर चेअरमन नाही, संचालक नाही.
#Kolhapur #NCP2019
ऊसाची शेती कशी चांगली होईल यासाठी कार्यरत राहणाऱ्या संस्थेवर मी प्रमुख म्हणून आहे हे मोदींना माहिती नाही. मोदी साखर कारखानदारीवर टीका करत होते मात्र स्टेजवर त्यांच्या आजूबाजूला बसलेले सर्व लोक साखर उद्योगाशी संबंधित होते आणि हे माझ्यावर टीका करतात.
#Kolhapur #NCP2019
विरोधकांचा सन्मान करण्याची भारताची परंपरा आहे मात्र हे सत्तेचा उपयोग विरोधकांना कारवाई करण्यासाठी करत आहेत. काल सत्तेचा उपयोग करून यांनी डीएमकेच्या खासदार कन्निमोळी यांच्या घरावर धाड टाकली, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांवर धाडी टाकल्या.
विरोधात म्हणून चंद्रबाबू नायडू यांच्यावर धाडी टाकल्या, देवेगौडांवर धाडी टाकल्या. या धाडींमधून मिळाले काहीच नाही मात्र विरोधकांना बदनाम करण्याचे काम केले जात आहे. या देशात सुडाचे राजकारण कधी सहन केले गेले नाही. या करतुतींमुळे विरोधकांना पाठिंबा मिळेल व मोदींचा निश्चित पराभव होईल.
Missing some Tweet in this thread?
You can try to force a refresh.

Like this thread? Get email updates or save it to PDF!

Subscribe to Sharad Pawar
Profile picture

Get real-time email alerts when new unrolls are available from this author!

This content may be removed anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!