चार्ली चॅप्लिन
सर चार्ली चॅप्लिन | |
---|---|
जन्म |
चार्लस स्पेन्सर चॅप्लिन १६ एप्रिल, १८८९ वॅलवर्थ, लंडन, इंग्लंड, युनायटेड किंग्डम |
मृत्यू |
२५ डिसेंबर, १९७७ (वय ८८) वेव्ही, स्वित्झर्लंड |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
पेशा | चित्रपट नट, दिग्दर्शक, निर्माता |
कारकिर्दीचा काळ | १८९५-१९७६ |
जोडीदार |
मिल्ड्रेड हॅरिस (१९१८-२१) |
पुरस्कार | सर किताब |
स्वाक्षरी |
सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, जुनियर, ऊर्फ चार्ली चॅप्लिन, (एप्रिल १६, इ.स. १८८९ - डिसेंबर २५, इ.स. १९७७) हा मूकपटांमध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत तो मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात तो जगभरातल्या सर्वांत प्रसिद्ध सिनेताऱ्यांपैकी एक होता. हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यात एक समानता आहे. दोघाच्या पण मिशा सारखे होते. पण हिटलरला पूर्ण जग घाबरत असे. आणि चार्ली चॅप्लिन, लोकांमध्ये असलेली भीती संपवून त्यांना भरभरून हसवले. या महान कलाकाराचा जीवनात खूप दुःख होत. पण त्याने सर्व दुःख विसरून सर्वाना हासवण्यात आपले जीवन व्यतित केलं. त्या वेळी मूक चित्रपट असायचे, म्हणून चार्ली थोडासा जास्ती खास होतो. त्याने एकही शब्द न काढता सर्वाना हसवले.
हास्यसम्राट चार्ली चॅप्लिन यांचे महान विचार
[संपादन]- ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो दिवस फुकट गेला असे समझा.
- साधेपणा ही काही साधी गोष्ट नाही.
- या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही, तुमचा वाईट काळ सुद्धा
- आरसा माझा सर्वात चांगला मित्र आहे, कारण ज्या वेळी मी रडतो त्यावेळी तो हसत नाही.
- तुमचे उघडे शरीरावर त्यांचाच अधिकार आहे ज्यांनी तुमच्या उघड्या मनावर प्रेम केलं आहे.
- आपण विचार फार करतो आणि व्यक्त फार कमी होतो.
- तुमचं आयुष्य परत एकदा अर्थपूर्ण होईल, फक्त आता थोडं हसा.
- कोणत्या ही मनुष्याचे खरे चरित्र तेंव्हाच समोर येते जेंव्हा तो नशेत असेल.
- जीवन जवळून पाहिले तर खूप त्रासदायक वाटते, पण जेव्हा याला दुरून पहिले तर कॉमेडी वाटते.
- मी हमेशा पावसात चालतो कारण मला रडताना कोणी पाहू नये म्हणून.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- चार्ली चॅप्लिन संग्रह (इंग्लिश मजकूर)