इ.स. १९९९
Appearance
(ई.स. १९९९ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे |
वर्षे: | १९९६ - १९९७ - १९९८ - १९९९ - २००० - २००१ - २००२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जानेवारी-जून
[संपादन]- जानेवारी ४ - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका शिया मशीदीवर नमाज दरम्यान गोळीबार. १६ ठार, २५ जखमी.
- जानेवारी २५ - पश्चिम कोलंबियात भूकंप. १,००० ठार.
- फेब्रुवारी ७ - जॉर्डनचा राजा हुसेनच्या मृत्युनंतर युवराज अब्दुल्ला राजेपदी.
- फेब्रुवारी ११ - मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर.
- फेब्रुवारी १२ - संगीत क्षेत्रातील असाधारण स्वरूपाच्या कामगिरीबद्दल ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना टोरांटो विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर पुरस्कार जाहीर.
- फेब्रुवारी २३ - ऑस्ट्रियाच्या गाल्ट्युर गावावर हिमप्रपात. ३१ ठार.
- फेब्रुवारी २४ - चायना सदर्न एरलाइन्सचे टी.यु.१५४ प्रकारचे विमान चीनच्या वेन्झू विमानतळावर कोसळले. ६१ ठार.
- फेब्रुवारी २७ - ओलुसेगुन ओबासान्जो नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- एप्रिल १९ - जर्मनीची संसद परत बर्लिन येथे.
- एप्रिल २० - कॉलोराडोच्या लिटलटन शहरात एरिक हॅरिस व डिलन क्लेबोल्डने आपल्या कोलंबाइन हायस्कूल या शाळेतील १२ विद्यार्थी व १ शिक्षकाला ठार मारले व नंतर आत्मह्त्या केली.
- मे २ - मिरेया मॉस्कोसो पनामाच्या पंतप्रधानपदी. मॉस्कोसो पनामाची सर्वप्रथम स्त्री पंतप्रधान आहे.
- मे ३ - ओक्लाहोमा सिटी येथे एफ.५ टोर्नेडो. ६६ ठार. ६५२ जखमी १,००,००,००,००० अमेरिकन डॉलरचे नुकसान.
- मे १७ - एहूद बराक इस्रायेलच्या पंतप्रधानपदी.
- मे २६-जून १२ - भारत व पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध. पाकिस्तानचा पराभव.
- जून ९ - युगोस्लाव्हिया व नाटोमध्ये संधी.
जुलै-डिसेंबर
[संपादन]- जुलै २० - चीनने फालुन गॉॅंग या संघटनेस दुष्ट संघटना ठरवले व त्यावर बंदी टाकली.
- जुलै २५ - लान्स आर्मस्ट्रॉॅंगने आपली पहिली टुर दि फ्रांस सायकल शर्यत जिंकली.
- डिसेंबर २१ - स्पेनच्या नागरी रक्षकांनी ९५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली गाडी पकडली. तोरे पिकासो वरील हल्ला टळला.
- डिसेंबर २२ - स्पेनच्या नागरी रक्षकांनी ७५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली अजुन एक गाडी पकडली.
- डिसेंबर २२ - तांद्जा ममदु नायजरच्या अध्यक्षपदी.
- डिसेंबर २८ - तुर्कमेनिस्तानने सपार्मुरात नियाझोवला आजन्म अध्यक्ष घोषित केले.
- ऑगस्ट १५ - अल्जीरियात दहशतवाद्यांनी २९ लोकांना ठार मारले.
- ऑगस्ट १७ - तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.४ तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- फेब्रुवारी ७ - हुसेन, जॉर्डनचा राजा.
- फेब्रुवारी ८ - डॉ.इंदुताई पटवर्धन, ज्येष्ठ समाजसेविका.
- फेब्रुवारी २० - जीन सिस्केल, अमेरिकन चित्रपट समीक्षक, एबर्ट आणि सिस्केलचा अर्धा भाग.
- मार्च ८ - ज्यो डिमाजियो, अमेरिकन बेसबॉलपटू.
- मे २ - पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, जयपूर घराण्याचे गायक.
- मे २४ - गुरू हनुमान तथा विजयपाल लालाराम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती मार्गदर्शक.
- मे २५ - डॉ. बी. डी. टिळक, संचालक - पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा.
- जून २७ - जॉर्ज पापादुपॉलस, ग्रीसचा हुकुमशहा.
- जुलै ७ - एम. एल. जयसिंहा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १ - निरद चौधरी, इंग्लिश लेखक.
- सप्टेंबर १८ - हसरत जयपुरी, गीतकार
- सप्टेंबर २१ - पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक.