आंह्वी
आंह्वी (देवनागरी लेखनभेद: आंहुई, आंह्-वी; सोपी चिनी लिपी: 安徽; फीन्यिन: Ānhuī ) हा चीन देशातला पूर्वेकडील प्रांत आहे. यांगत्से व ह्वायहे नद्यांच्या खोऱ्यांमध्ये वसलेल्या आंह्वीच्या सीमा पूर्वेस ज्यांग्सू, आग्नेयेस च-च्यांग, दक्षिणेस च्यांग्शी, नैऋत्येस हूपै, वायव्येस हनान व उत्तरेस शांतोंग या प्रांतांना लागून आहेत. हफै ही आंह्वीची राजधानी आहे.
आंह्वी 安徽省 | |
चीनचा प्रांत | |
आंह्वीचे चीन देशामधील स्थान | |
देश | चीन |
राजधानी | हफै |
क्षेत्रफळ | १,३९,४०० चौ. किमी (५३,८०० चौ. मैल) |
लोकसंख्या | ६,१३,५०,००० |
घनता | ४४० /चौ. किमी (१,१०० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | CN-AH |
संकेतस्थळ | http://www.ah.gov.cn/ |
भूगोल
संपादनआंह्वी प्रांताच्या उत्तरेकडचा भूप्रदेश सखल असून तो उत्तर चिनी मैदानाचा भाग म्हणून गणला जातो. प्रांताच्या मध्यभागातून ह्वायहे नदी वाहते. आंह्वीच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशात व मध्य आंह्वीतल्या ह्वायहे नदीच्या खोऱ्यात दाट वस्ती आहे. प्रांताच्या दक्षिणेकडील भाग डोंगराळ असून त्यातून यांगत्से नदी वाहते. आंह्वीच्या नैऋत्येकडील भूप्रदेशात ताब्ये पर्वतरांग पसरली असून तिच्यापासून फुटणाऱ्या डोगरांच्या व लहानलहान टेकड्यांच्या माळा आंह्वीच्या आग्नेय भागापर्यंत पसरल्या आहेत.
बाह्य दुवे
संपादन- आंह्वी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी मजकूर)
- आंह्वी पर्यटन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी व इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |